PM Surya Ghar Yojana : ऑक्टोबर २०२५ पर्यंत पीएम सूर्य घर योजनेतून २० लाख घरांना सौर ऊर्जा, मिळणार मोफत वीज

2 Min Read
PM Surya Ghar Yojana 20 Lakh Homes Solar Energy

PM Surya Ghar Yojana 20 Lakh Homes Solar Energy : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत २० लाख घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली स्थापित केली जाणार आहे, असे केंद्रीय विद्युत व अक्षय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांनी गुरुवारी सांगितले. या योजनेमुळे ऑक्टोबर २०२५ पर्यंत लाखो घरांना सौर ऊर्जेद्वारे वीज मिळणार आहे, ज्यामुळे घरगुती वीज बिल कमी होण्यास मदत होईल आणि पर्यावरणास अनुकूल ऊर्जा मिळेल.

श्रीपाद नाईक यांच्या मते, पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) सौर ऊर्जा क्षेत्रात एक महत्त्वाची भूमिका बजावत असून ती जगातली सर्वात मोठी सौर ऊर्जा योजना (Solar Yojana) आहे. या योजनेचे उद्दिष्ट मार्च २०२७ पर्यंत एक कोटी घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली स्थापित करणे आहे. मार्च २०२६ पर्यंत हे लक्ष ४० लाख घरांपर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. यासोबतच, २०२५ पर्यंत १० लाख घरांच्या छतावर सौर ऊर्जा उपकरणे बसवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली १५ फेब्रुवारी २०२४ रोजी ही योजना सुरू करण्यात आली असून यासाठी ७५,०२१ कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. पीएम सूर्य घर योजनेचा फायदा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना होणार असून त्यांना मोफत वीज मिळणार आहे.

  • २० लाख घरांना सौर ऊर्जा मिळणार
  • मार्च २०२७ पर्यंत १ कोटी घरांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली
  • पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची योजना
  • ७५,०२१ कोटी रुपयांची तरतूद

PM Surya Ghar या योजनेमुळे भारतात सौर ऊर्जा क्षेत्राचा विकास होईल आणि नागरिकांना स्वच्छ व पर्यावरण अनुकूल वीज मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली जाईल.

🔴 हेही वाचा 👉 लातूर जिल्ह्यातील २५ हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद, कारण….

Share This Article