Post Office Monthly Income Scheme: पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध आहे. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) ही योजना एकदा गुंतवणूक करून दरमहा नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. या योजनेतुन आकर्षक परतावा मिळतो.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम काय आहे?
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम या योजनेत गुंतवणूकदारांना एकदाच पैसे गुंतवावे लागतात, ज्यावर दरमहा व्याज मिळते. सध्या या योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर मिळतो आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि गुंतवणुकीची मर्यादा
- किमान गुंतवणूक: 1,000 रुपये
- कमाल गुंतवणूक:
- सिंगल अकाऊंटसाठी: 9 लाख रुपये
- जॉइंट अकाऊंटसाठी: 15 लाख रुपये
- योजनेची मुदत: 5 वर्षे
- निव्वळ उत्पन्न: 9 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा 5,550 रुपये व्याज मिळेल
व्याज कसे मिळेल?
या योजनेत तुम्ही मिळणारे व्याज दरमहा, तिमाही, सहामाही किंवा वार्षिक घेऊ शकता.
पैसे काढण्याची अट
- गुंतवणूक केल्यावर 1 वर्षानंतर पैसे काढता येतात.
- मुदत संपल्यानंतर पूर्ण रक्कम आणि व्याज मिळते.
का निवडावी ही योजना?
✅ सुरक्षित गुंतवणूक
✅ प्रत्येक महिन्याला नियमित उत्पन्न
✅ सरकारच्या संरक्षणाखालील योजना
✅ इतर बँक FD आणि योजनांपेक्षा अधिक व्याजदर
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (Post Office Monthly Income Scheme) ही नोकरी नसलेल्या किंवा निवृत्ती घेतलेल्या नागरिकांसाठी उत्तम पर्याय आहे. तुम्हाला सुरक्षित आणि नियमित उत्पन्न हवे असल्यास ही योजना तुमच्यासाठी योग्य ठरू शकते.
🔴 हेही वाचा 👉 कमीत कमी गुंतवणूक करून मिळवा पेन्शन, भारत सरकारची सामाजिक सुरक्षा योजना.