Ration Card E Kyc Update 2025 : महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी न केल्यास धान्य मिळणार नाही, सरकारकडून असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
काय आहे सरकारचा निर्णय?
Ration Card Maharashtra News : राज्यातील अंत्योदय अन्न योजना (Antyodaya Anna Yojana) आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या (Pradhanya Kutumb) लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. ही प्रक्रिया १५ फेब्रुवारीपूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा रेशनकार्ड धारकांना सरकारी रेशन दुकानांतून धान्य मिळणार नाही.
ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण कसे करावे?
रेशनकार्डधारकांसाठी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. यासाठी लाभार्थ्यांना जवळच्या रेशन दुकान किंवा सरकारद्वारे रबवल्या जाणाऱ्या विशेष शिबिरांमध्ये जाऊन आधार कार्ड व अंगठ्याचा ठसा देऊन प्रमाणीकरण करावे लागेल.
रेशन दुकानांमध्ये ई-केवायसी सुविधा उपलब्ध
राज्यात ‘वन नेशन, वन रेशनकार्ड’ योजना (One Nation One Ration Card Yojana) लागू असल्याने लाभार्थी कोणत्याही रेशन दुकानातून धान्य घेऊ शकतात. त्यामुळे त्यांना ते धान्य घेत असलेल्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी (Ration Card Ekyc Maharashtra) करणे बंधनकारक असेल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेबाबत नवीन नियम; आता ‘या’ महिलांना मिळणार नाही लाभ!.
ई-श्रम नोंदणीकृत कामगारांसाठीही शिधापत्रिका
ज्या स्थलांतरित व असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली आहे, पण शिधापत्रिका मिळालेली नाही, त्यांच्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. अशा लाभार्थ्यांनी तातडीने तहसील कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह शिधापत्रिका मिळवावी.
१५ फेब्रुवारीपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा
Ration Card Ekyc Maharashtra Last Date : शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की १५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ई-केवायसी आणि आधार प्रमाणीकरण न केल्यास लाभार्थ्यांना १५ फेब्रुवारी नंतर रेशन मिळणार नाही. त्यामुळे तातडीने जवळच्या रेशन दुकानात किंवा शिबिरामध्ये जाऊन प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
🔴 नोकरीची संधी 👉 अंगणवाडी भरती 2025: 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी! अर्ज प्रक्रिया सुरू.