मुंबई, 6 फेब्रुवारी 2025: RBI 2000 Rupee Note Update 2025 – भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ₹2000 च्या नोटांबाबत नवी माहिती दिली आहे. RBI ने सांगितले की, बंद करण्यात आलेल्या ₹2000 च्या 98.15% नोटा बँकांमध्ये परत आल्या आहेत. मात्र, अजूनही लोकांकडे ₹6,577 कोटी किमतीच्या नोटा बाकी आहेत.
₹2000 च्या किती नोटा परत आल्या आहेत?
2000 Rupee Note News: RBI च्या अहवालानुसार, 19 मे 2023 रोजी ₹2000 च्या नोटा चलनातून काढण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यावेळी एकूण ₹3.56 लाख कोटी किमतीच्या नोटा चलनात होत्या. 31 जानेवारी 2025 पर्यंत हे प्रमाण कमी होऊन ₹6,577 कोटींवर आले आहे.
अजूनही नोटा बदलता येतील का?
होय! ₹2000 च्या नोटा जमा करण्याची सुविधा सर्व बँकांमध्ये 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत होती. सध्या ही सुविधा RBI च्या 19 इश्यू ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.
कुठे व कस बदलता येतील?
- RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये थेट जाऊन नोटा बदलता येतात.
- पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये नोटा पाठवता येतात.
- नोटा जमा करून पैसे बँक खात्यात क्रेडिट करता येतात.
🔴 हेही वाचा 👉 नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! PF व्याजदर वाढणार.
₹2000 च्या नोटा अजूनही कायदेशीर?
होय! ₹2000 च्या नोटा चलनातून काढण्यात आल्या असल्या तरी त्या अद्याप कायदेशीर स्वरूपात स्वीकारल्या जातील. या नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये चलनात आणण्यात आल्या होत्या, तेव्हा ₹1000 आणि ₹500 च्या जुन्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.
तुमच्या कडे अजून ₹2000 च्या नोटा आहेत?
जर तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर तुम्ही त्या त्वरित RBI च्या इश्यू ऑफिसमधून बदलून घ्याव्यात. भविष्यात या नोटा स्वीकारल्या जातील की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही.