SGB Scheme Closure Gold Bond Investment News 2025 : भारत सरकारची लोकप्रिय सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) योजना लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना बंद केल्यास सामान्य नागरिकांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत सोने खरेदी करण्याचा पर्याय राहणार नाही. शनिवारी अर्थसंकल्पानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना का बंद होऊ शकते?
सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये (Sovereign Gold Bond) ही योजना सुरू केली होती. त्याअंतर्गत नागरिकांना कमी किमतीत सोन्यात गुंतवणुकीची संधी दिली जात होती. यामध्ये 2.5% व्याजदरासह सोने खरेदी करता येत होते. मात्र, मागील काही वर्षांत सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सरकारसाठी ही योजना तोट्याची ठरत आहे.
अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, “होय, आम्ही सॉवरेन गोल्ड बॉन्ड योजना बंद करण्याच्या विचारात आहोत.” तसेच आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव अजय सेठ यांनीही या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.
गोल्ड बॉन्ड योजनेचा गुंतवणूकदारांना किती फायदा झाला?
2015 मध्ये या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 2,684 रुपये प्रति ग्रॅम दराने सोने देण्यात आले होते. आठ वर्षांनी, 2023 मध्ये त्याच सोन्याची किंमत 6,132 रुपये प्रति ग्रॅम झाली. यामुळे गुंतवणूकदारांना 128.5% नफा झाला आहे.
🔴 हेही वाचा 👉 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025, राज्यातील महिलांसाठी अंगणवाडी सेविका बनण्याची मोठी संधी.
सरकारचा निर्णय आणि गुंतवणूकदारांवरील परिणाम
जर सरकारने (SGB Scheme) ही योजना बंद केली, तर स्वस्तात सोने खरेदी करण्याचा मार्ग बंद होईल. परिणामी, सामान्य नागरिकांना वाढत्या सोन्याच्या किमतींमुळे (Gold Price) गुंतवणूक करणे कठीण जाईल. तसेच, बाजारातील इतर गुंतवणूक पर्यायांमधील अधिक सुरक्षित परतावा देणारा हा पर्यायही उपलब्ध राहणार नाही.
सध्याच्या गुंतवणूकदारांचे काय?
योजनेतील विद्यमान गुंतवणूकदारांना घाबरण्याची गरज नाही. सरकारने आधी घेतलेल्या गुंतवणुकींवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, नवीन गुंतवणूकदारांसाठी ही योजना सुरु राहील की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.
इतर पर्याय कोणते?
- सोन्याचे ETFs किंवा म्युच्युअल फंड्स
- फिजिकल गोल्ड खरेदी (मात्र, यात दागिने बनवण्याचा खर्च जास्त असतो)
- डिजिटल गोल्ड गुंतवणूक
पुढील काही दिवसांत याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
🔴 Gold Rate 👉 4 फेब्रुवारी 2025 रोजीचे सोन्या-चांदीचे नवीन दर येथे जाणून घ्या!.