Valentine’s Day 2025: मोठ्या ब्रँड्सकडून सोन्याच्या दागिन्यांवर 50% पर्यंत सूट, कमी किमतीत दागिने खरेदी करण्याची संधी!

2 Min Read
Valentines Day 2025 Gold Jewelry Making Charge Calculation

Valentines Day 2025 Gold Jewelry Making Charge Calculation : व्हॅलेंटाईन डे 2025 (Valentine’s Day 2025) च्या निमित्ताने देशभरातील मोठे आणि स्थानिक ज्वेलर्स ग्राहकांसाठी खास सवलती घेऊन आले आहेत. अनेक ज्वेलर्स सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर मोठी सूट देत आहेत. मात्र, सर्वात मोठी सूट मेकिंग चार्जवर दिली जात आहे. त्यामुळे कमी किंमतीत सोन्याचे दागिने खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

जेव्हा ज्वेलर्स दागिने तयार करतात, तेव्हा त्यामध्ये कारागिरांची मेहनत, डिझाइनिंग आणि इतर खर्च धरले जातात. हेच मेकिंग चार्ज म्हणून आपल्याकडून घेतले जाते. साधारणतः दोन प्रकारे हे चार्ज ठरवले जातात:

  1. प्रति ग्रॅम दराने –
  • काही ज्वेलर्स दर ग्रॅमसाठी ठराविक रक्कम घेतात.
  • उदा. जर मेकिंग चार्ज 600 रुपये प्रति ग्रॅम असेल आणि तुम्ही 10 ग्रॅम सोन खरेदी केल, तर मेकिंग चार्ज 6000’रुपये (10×600) लागेल.
  1. टक्केवारीच्या आधारावर –
  • दागिन्यांच्या एकूण किंमतीवर ठराविक टक्केवारी लावली जाते.
  • उदा. जर ₹5,00,000 किंमतीच्या ज्वेलरीसाठी 10% मेकिंग चार्ज असेल, तर 50,000 ज्यादा द्यावे लागतात.

व्हॅलेंटाईन डे ऑफर्स – मोठ्या ब्रँड्सकडून आकर्षक सूट!

Gold Jewellery Valentine Day Offer: यंदा व्हॅलेंटाईन डे 2025 निमित्त अनेक ज्वेलर्स मेकिंग चार्जवर 25% ते 50% पर्यंत सूट देत आहेत. काही प्रमुख ब्रँड्सच्या ऑफर्स:

  • कंदरे (Candere) – गोल्ड चेनच्या मेकिंग चार्जवर 40% सूट.
  • तनिष्क (Tanishq Titan) – 14 जानेवारी ते 3 मार्च 2025 पर्यंत सोने, हिरे, प्लॅटिनम दागिन्यांवर 5% ते 25% सूट.
  • कॅरेटलेन (CaratLane) – मेकिंग चार्जवर 20% सूट.
  • जॉयलुक्कास (Joyalukkas) – सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर 18% आणि डायमंड ज्वेलरीवर 50% पर्यंत सूट.
  • सेन्को गोल्ड (Senco Gold) – मेकिंग चार्जवर 15% ते 75% पर्यंत मोठी सूट.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्याचा आजचा भाव (13 फेब्रुवारी 2025).

कमी किमतीत दागिने खरेदी करण्याची संधी!

या Valentine Day 2025 Gold Jewellery Offer मर्यादित कालावधीसाठी आहेत, त्यामुळे लवकरात लवकर खरेदी करून याचा लाभ घ्या. सोन्याच्या किंमती (Gold Price) वाढत असल्याने, कमी किमतीत ज्वेलरी खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे.

🔴 हेही वाचा 👉 सोने खरेदी करताना या 5 गोष्टींची घ्या काळजी, अन्यथा होऊ शकते तुमची फसवणुक.

(Disclaimer: वरील ऑफर्स ज्वेलर्सच्या अटी व शर्तींवर आधारित आहेत. खरेदीपूर्वी अधिकृत संकेतस्थळावरून किंवा संबंधित दुकानातुन सविस्तर माहिती घ्या.)

Share This Article