Ladki Bahin Yojana : अपात्र महिलांकडून पैसे वसूल करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले

2 Min Read
Will Maharashtra Government Recover Money From Ineligible Women In Ladki Bahin Yojana

Will Maharashtra Government Recover Money From Ineligible Women In Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर सध्या राजकीय चर्चा रंगल्या आहेत. काहींनी आरोप केला आहे की, योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र महिलांकडून सरकार रक्कम परत घेणार आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे या दाव्यांना खोडून काढले आहे.

अपात्र महिलांकडून पैसे वसूल करणार नाही

पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक समारंभात बोलताना अजित पवार म्हणाले, “लाडकी बहीण योजनेअंतर्गत वितरित केलेल्या निधीची वसुली केली जाणार नाही. मागील वेळी लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी मर्यादित वेळ होता. त्यामुळे काही त्रुटी राहिल्या असतील, परंतु लाभ मिळालेल्या महिलांना पैसे परत करावे लागणार नाहीत.”

राजकीय आरोप आणि सरकारचे स्पष्टीकरण

अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. विरोधकांनी योजनेतील अपात्र महिलांकडून पैसे वसूल करून योजना बंद करण्याचा सरकारचा हेतू असल्याचा आरोप केला होता. मात्र, अजित पवार यांच्या वक्तव्याने या सर्व अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

महायुती सरकारने २०२४ च्या निवडणुकीपूर्वी सुरू केलेल्या या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक मदत करणे. सध्या २.४३ कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून, या योजनेमुळे सध्या सरकारच्या तिजोरीवर दरमहा ३,७०० कोटी रुपयांचा भार पडत आहे.

हफ्त्याची रक्कम २१०० रुपये करणार का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने १,५०० रुपयांच्या मासिक हफ्त्यात वाढ करून तो २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात स्पष्ट केले की, पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर योजनेचा मासिक हफ्ता वाढवला जाईल.

माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) महाराष्ट्रातील महिलांसाठी एक मोठा आधार बनली आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरली असून, अजित पवारांच्या स्पष्टीकरणामुळे महिलांमधील या योजनेबाबतचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

🔴 हेही वाचा 👉 जानेवारीचा सातवा हप्ता जमा झाला की नाही ‘अस’ तपासा.

लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) हफ्त्यांची वसुली होणार नसल्याचे अजित पवारांनी जाहीर केल्याने महिलांना दिलासा मिळाला आहे. पुढील अर्थसंकल्पीय सत्रात हफ्ता वाढीसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. महिलांनी आपल्या खात्यात 7व्या पैसे जमा झाले आहेत का, याची त्वरीत खात्री करावी.

Share This Article