चीनमध्ये सापडला जगातील जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा! किंमत 7,09,57,71,69,600 रुपये! World’s Largest Gold Reserve China 7095771696000 Rs Worth

2 Min Read
Worlds Largest Gold Reserve China 7095771696000 Rs Worth

World’s Largest Gold Reserve China 7095771696000 Rs Worth : चीनमध्ये जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडला आहे. हा साठा हुनान प्रांतातील पिंगजियांग काउंटी येथे सापडला आहे. 15 फेब्रुवारी 2025 रोजी ही मोठी माहिती समोर आली. हा साठा जवळपास 1,000 टन सोन्याचा असून त्याची अंदाजित किंमत 7.09 लाख कोटी रुपये (600 अब्ज युआन) एवढी आहे.

सोन्याच्या किमतीत मोठी वाढ

गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किमती (Gold Price) सातत्याने वाढत आहेत. ANI च्या अहवालानुसार, 15 फेब्रुवारी रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम ₹88,285 वर पोहोचली. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांचा कल सोन्याकडे वाढत आहे.

कुठे सापडला हा प्रचंड सोन्याचा साठा?

इंडियन डिफेन्स रिव्ह्यूच्या अहवालानुसार, वांगू गोल्ड फील्डमध्ये 40 हून अधिक सोन्याच्या शिरे आढळल्या आहेत. या शिरा 2,000 मीटर खोलीपर्यंत आहेत. सुरुवातीच्या अंदाजानुसार या ठिकाणी 300 मेट्रिक टन सोनं आहे. मात्र, 3,000 मीटर खोलीपर्यंत शोध घेतल्यानंतर हा साठा 1,000 मेट्रिक टनांहून अधिक असल्याचे समोर आले.

संपत्ती आणि रोजगार निर्मितीला चालना

World’s Largest Gold Reserve China: हा शोध चीनच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देऊ शकतो. तसेच, या खाण क्षेत्रात हजारो रोजगार निर्माण होतील. भूवैज्ञानिक चेन रुलिन यांच्या मते, 138 ग्रॅम प्रति टन इतक्या उच्च शुद्धतेचे नमुने आढळले आहेत. हा शोध आधुनिक काळातील सर्वात मोठ्या आणि फायदेशीर सोन्याच्या खाणींपैकी एक ठरू शकतो.

सोन्याच्या बाजारावर परिणाम?

जगातील सोन्याच्या किमतींवर (Gold Rate) या नव्या शोधाचा मोठा परिणाम होऊ शकतो. चीन हा आधीच सोन्याच्या उत्पादनात आघाडीचा देश आहे. हा नवा साठा सापडल्याने चीनचे सोन्यावरील वर्चस्व आणखी वाढणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 एका आठवड्यात इतक्या रुपयांनी घसरले सोन्याचे दर, जाणून घ्या आजचा सोन्याचा दर (16 फेब्रुवारी 2025).

Share This Article