मुंबई | १३ फेब्रुवारी २०२५: RBI New 50 Rupees Note 2025 – भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) ५० रुपयांच्या नवीन नोटेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच ५० रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे. या नोटेवर आरबीआयचे नवनियुक्त गव्हर्नर संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांची स्वाक्षरी असणार आहे.
50 रुपयांची नवी नोट कशी असेल?
- सिरीज – महात्मा गांधी (नवीन) सिरीज
- आकार – ६६ मिमी X १३५ मिमी
- रंग – फ्लोरोसेंट निळा
- मागील बाजू – हंपी आणि रथाचे चित्र, जे भारताचा सांस्कृतिक वारसा दर्शवते
सध्याच्या नोटांचे काय?
आरबीआयने स्पष्ट केले आहे की आधीच्या ५० रुपयांच्या नोटा वैध राहतील. त्यामुळे जुन्या नोटा वापरण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
संजय मल्होत्रा कोण आहेत?
- डिसेंबर २०२४ मध्ये संजय मल्होत्रा (Sanjay Malhotra) यांनी आरबीआय गव्हर्नर पदाचा कार्यभार स्वीकारला.
- यापूर्वी ते वित्तीय सेवा विभागाचे (DFS) सचिव होते.
- २०२२ मध्ये केंद्र सरकारने त्यांची RBI गव्हर्नरपदी नियुक्ती केली होती.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांचा आक्रोश! आमच्यावर अन्याय का?.
नवीन नोट कधी येणार?
RBI To Issue Rs 50 Rs New Notes : आरबीआयने अधिकृत घोषणा केली असली तरी नवीन ५० रुपयांची नोट नेमकी कधी चलनात येईल, याबाबत अद्याप माहिती दिली नाही. मात्र, लवकरच ही नोट बँकांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 EPFO News Today : पीएफ धारकांसाठी महत्वाची बातमी.