मुंबई, 14 फेब्रुवारी 2025: Maharashtra Anganwadi Sevika Recruitment 2025 – महाराष्ट्र राज्यात अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. महिला व बालविकास विभागाने राज्यभरात 5639 अंगणवाडी सेविका आणि 13243 अंगणवाडी मदतनीस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अटी आणि पात्रतेच्या माहितीवर एक नजर टाकूया.
कोण अर्ज करू शकत?
शैक्षणिक पात्रता:
- अंगणवाडी मदतनीस पदासाठी: किमान इयत्ता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. मराठी विषयासह उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
- जास्त शैक्षणिक पात्रता असल्यास संबंधित प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक.
वयोमर्यादा:
- अर्जदाराचे वय 18 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असावे.
- विधवा उमेदवारांसाठी वयोमर्यादा कमाल 40 वर्षे राहील.
भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाच्या अटी
- स्थानिक रहिवासी अट: उमेदवार संबंधित महसुली गाव/वाडी/तांडा/वस्ती येथे स्थायिक असावा.
- लहान कुटुंब अट: अर्जदार महिलेस जास्तीत जास्त दोन हयात अपत्ये असणे आवश्यक. जास्त अपत्य असल्यास पात्र ठरणार नाही.
- अर्ज प्रक्रिया: विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत सादर करावा.
- शासन निर्णय बंधनकारक: भरती प्रक्रियेत वेळोवेळी होणाऱ्या शासन निर्णयांचे पालन करावे लागेल.
- एकाच पदासाठी अर्ज: उमेदवाराने एका पदासाठी फक्त एक अर्जच करावा.
- अंतिम निवड प्रक्रियेत बदल शक्य: रिक्त पदांची संख्या कमी-जास्त होऊ शकते.
- निवड मानधनी तत्त्वावर: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदे मानधनी स्वरूपाची असल्याने नियमित सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असणारे वेतन, भत्ते लागू राहणार नाहीत.
- अर्जातील माहिती खरी असावी: चुकीची माहिती आढळल्यास अर्ज थेट बाद केला जाईल.
अर्ज कधी व कुठे करावा?
अर्ज स्वीकृतीची अंतिम तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना लक्षपूर्वक वाचावी.
🔴 हेही वाचा 👉 अंगणवाडी सेविका भरती 2025: अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची संपूर्ण यादी.
शेवटची संधी गमावू नका!
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून काम करण्याची इच्छा असणाऱ्या महिलांसाठी (Anganwadi Sevika Recruitment 2025 Maharashtra) ही सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरीच्या (Sarkari Naukri) शोधात असलेल्या महिला उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी तयारी करावी!
🔴 व्हायरल व्हिडीओ 👉 Police Bharti 2025 Motivation: “आई तुझा लेक पोलीस झाला गं! – माय-लेकाचा भावूक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.