लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! Maharashtra Government Budget Cut 30 Percent

3 Min Read
Maharashtra Government Budget Cut 30 Percent

मुंबई, 14 फेब्रुवारी 2025: Maharashtra Government Budget Cut 30 Percent – महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) होत असलेली आर्थिक तूट नियंत्रणात आणण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. महसुली आणि भांडवली खर्चात 30% कपात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, सरकारी वाहनांच्या इंधन खर्चातही 20% कपात होणार आहे.

माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) आणि राज्यातील काही लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार येत आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”, “लाडका भाऊ”, शेतकऱ्यांसाठी मोफत वीज यांसारख्या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. परिणामी, सरकारला खर्च कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.

🔴 हेही वाचा 👉 घर नसणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! साकार होणार घराच स्वप्न.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकदा राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात निधी अपुरा पडत असल्याने खर्च कपात करावी लागली आहे. सुधारित अंदाजपत्रक तयार करताना अर्थसंकल्पातील केवळ 70% निधी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सरकारी वाहनांच्या इंधन खर्चातही कपात करण्यात आली आहे. विविध विभागांना 18 फेब्रुवारीपर्यंत खर्चाच्या तपशीलासह अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निधी योग्यप्रकारे वापरण्यात आला आहे का, याची खात्री करूनच पुढील वाटप होणार आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली होती. “माझी लाडकी बहीण” योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. याशिवाय, सरकारने एकूण 1 लाख कोटींपेक्षा जास्त पुरवणी मागण्या सादर केल्या. त्यामुळे वित्तीय तूट 2 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे.

सरकारी खर्चावर नियंत्रण

राज्य सरकारच्या 8.23 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदींपैकी आतापर्यंत 6.18 लाख कोटी रुपये वितरित झाले आहेत. मात्र, प्रत्यक्ष खर्च केवळ 3.86 लाख कोटी रुपये म्हणजे 46.89% झाला आहे. त्यामुळे आर्थिक वर्षाच्या उर्वरित काळात खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या योजनांना सूट

सर्वसामान्य योजनांच्या खर्चात कपात केली असली तरी काही योजनांना संपूर्ण निधी मिळणार आहे.

  • जिल्हा वार्षिक योजना
  • आमदार स्थानिक विकास निधी
  • केंद्र पुरस्कृत योजना
  • शिष्यवृत्ती, विद्यावेतन
  • कर्ज, व्याज आणि निवृत्तिवेतन

🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव १४ फेब्रुवारी २०२५.

खर्चावर बंधने

राज्य सरकारने खालीलप्रमाणे खर्च मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे:

  • वेतन – 95%
  • वीज, पाणी, दूरध्वनी – 80%
  • कंत्राटी सेवा – 90%
  • कार्यालयीन खर्च – 80%
  • व्यावसायिक सेवा – 80%

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 1500 सोडून अजून दरमहा 1500 रुपये मिळवा.

राज्याची आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी (Maharashtra Government Budget Cut) सरकारचे हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, खर्च कपातीमुळे काही विभागांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

🔴 नोकरी 👉 महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती 2025! महत्त्वाच्या अटी व पात्रता निकष जाणून घ्या.

Share This Article