14 फेब्रुवारी 2025: Indian Currency Mahatma Gandhi Photo RBI Update – भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हटवला जाणार असल्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने स्पष्ट केल आहे की, सध्या अशा कोणत्याही बदलाचा विचार केला जात नाही. सोशल मीडियावर या संदर्भात अनेक अफवा पसरत होत्या, मात्र RBI च्या नव्या अपडेटनुसार महात्मा गांधींच्या प्रतिमेवर कोणताही निर्णय झालेला नाही.
🔴 हेही वाचा 👉 व्हॅलेंटाईन डे दिवशी सोन्याचा दर वाढला.
महात्मा गांधींचा फोटो का महत्त्वाचा आहे?
1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय नोटांवर कोणाचा फोटो असावा, यावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर 1969 मध्ये महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे विशेष नोटांवर छायाचित्र समाविष्ट करण्यात आले. तेव्हापासून भारतीय चलनावर गांधीजींचा फोटो कायम आहे.
नव्या नोटांवर बदल होणार का?
RBI Update : RBI च्या माहितीनुसार, भविष्यात भारतीय नोटांवर इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रतिमा समाविष्ट करण्याचा विचार केला जाऊ शकतो. यामध्ये रवींद्रनाथ टागोर आणि एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचा समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
नोटांवरील फोटो बडदलांचा इतिहास
- 1949: ब्रिटिश राजवटीतील किंग जॉर्ज यांचा फोटो काढून अशोक स्तंभ समाविष्ट केला.
- 1950: ₹1, ₹2, ₹5, ₹10, ₹100 च्या नोटांवर नवीन डिझाइन आले.
- 1969: महात्मा गांधींच्या प्रतिमेचा समावेश करण्यात आला.
- 2000 नंतर: महात्मा गांधी सिरीजच्या नव्या नोटा आणण्यात आल्या.
🔥 हेही वाचा 👉 Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.
RBI च स्पष्ट मत
RBI ने सांगितल आहे की, सध्या महात्मा गांधींचा फोटो हटवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. भविष्यात अन्य महान व्यक्तींच्या प्रतिमा समाविष्ट होण्याची शक्यता आहे, पण त्याबाबत ठोस निर्णय झालेला नाही.
भारतीय नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो हा केवळ चलनाचा भाग नाही, तर तो भारतीय स्वातंत्र्यलढ्याच प्रतीक आहे.
🔴 हेही वाचा 👉 गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी भारत सरकारचा महत्त्वाचा इशारा!.