New India Cooperative Bank RBI Action Board Dismissed : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड वर मोठी कारवाई केली आहे. बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त* करण्यात आले असून, पुढील 12 महिन्यांसाठी संचालक पदावर राहणार नाहीत.
RBI चा मोठा निर्णय
आरबीआयने 35 अ अंतर्गत ही कारवाई केली आहे. यामुळे बँकेवर विविध निर्बंध लादण्यात आले आहेत.
- बँक नवीन कर्ज मंजूर करू शकणार नाही.
- सध्याच्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही.
- नवीन ठेवी स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- कोणतीही नवी गुंतवणूक करता येणार नाही.
New India Cooperative Bank News Today: बँकेच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासक आणि सल्लागार समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये रविंद्र सप्रा (आरबीआयचे माजी जनरल मॅनेजर) आणि सीए अभिजित देशमुख यांचा समावेश आहे.
ठेवीदारांवर काय परिणाम?
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची आर्थिक स्थिती पाहता, RBI ने ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास मनाई केली आहे. मात्र, काही ठेवीदारांना DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) कडून 5 लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे.
ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती
- बँकेच्या अंधेरी शाखेत फक्त लॉकरधारकांना प्रवेश देण्यात येत आहे.
- इतर ग्राहकांना नंतर संपर्क करण्यास सांगण्यात येत आहे.
- बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन निर्बंध उठवले जातील.
RBI चा पुढील निर्णय महत्त्वाचा!
या निर्बंधांचा कालावधी 6 महिने असणार आहे. या काळात बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला जाईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.
🔴 हेही वाचा 👉 ऑनलाइन फसवणूक झाली आहे का? लगेच या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा, पैसे परत मिळण्याची संधी!.