WhatsApp यूजर्ससाठी मोठा धोका! RBI ची महत्त्वाची चेतावणी, त्वरित खबरदारी घ्या

2 Min Read
Whatsapp Digital Arrest Fraud RBI Warning

नवी दिल्ली | 15 फेब्रुवारी 2025: Whatsapp Digital Arrest Fraud RBI Warning – भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) WhatsApp वापरणाऱ्या करोडो लोकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. RBI ने एक विशेष संदेश पाठवला आहे आणि सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतात सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, अनेक नागरिक ठगांच्या जाळ्यात अडकत आहेत. केंद्र आणि राज्य सरकार सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करत आहेत. मात्र, आपली सुरक्षा आपल्याच हातात आहे.

RBI ने दिलेली चेतावणी काय आहे?

सायबर गुन्हेगार नवनवीन युक्त्या वापरून लोकांना फसवत आहेत. त्यात “डिजिटल अरेस्ट” (Digital Arrest) नावाच्या नव्या प्रकाराची वाढ झाली आहे. यावर RBI ने थेट प्रतिक्रिया दिली आहे आणि नागरिकांना सावध राहण्यास सांगितले आहे.

RBI च्या अधिकृत संदेशात लिहिले आहे

Whatsapp Digital Arrest Fraud RBI Warning: “तुम्हाला डिजिटल अरेस्टची धमकी मिळत आहे का? कायद्यात डिजिटल अरेस्ट अस काहीही नाही. कोणत्याही प्रकारची वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका. कोणालाही पैसे पाठवू नका. मदतीसाठी 1930 या क्रमांकावर कॉल करा.”

डिजिटल अरेस्ट म्हणजे काय?

सायबर गुन्हेगार WhatsApp वर व्हिडिओ कॉल करून लोकांना धमकावत आहेत. ते स्वतःला अधिकारी असल्याचे सांगतात आणि डिजिटल अरेस्टची भीती दाखवून मोठ्या रकमेची मागणी करतात. अनेक नागरिक अशा फसवणुकीला बळी पडले आहेत. काही प्रकरणांमध्ये लोकांनी मानसिक तणावाखाली आत्महत्याही केली आहे.

आपण कसे सुरक्षित राहू शकता?

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका.
  • तुमच्याकडून जर कोणी पैशांची मागणी करत असेल, तर लगेचच त्या व्यक्तीचा संपर्क तोडा.
  • डिजिटल अरेस्टची धमकी मिळाल्यास थेट 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा.
  • कोणत्याही बँक खात्याची किंवा OTP ची माहिती कुणासोबतही शेअर करू नका.
  • संशयास्पद संदेश किंवा कॉलची माहिती सायबर सेलकडे द्या.

RBI ने स्पष्टपणे सांगितले आहे की, भारतीय कायद्यात “डिजिटल अरेस्ट” (Digital Arrest) असा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. त्यामुळे अशा फसवणुकीपासून सावध राहा आणि कोणत्याही परिस्थितीत आर्थिक माहिती शेअर करू नका. जर तुम्हाला अशी कोणतीही धमकी मिळाली, तर त्वरित सायबर क्राइम हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधा. सुरक्षित राहा आणि सतर्क राहा.

🔴 हेही वाचा 👉 ऑनलाइन फसवणूक झाली आहे का? लगेच या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा, पैसे परत मिळण्याची संधी.

Share This Article