Aadhaar Update Rules: आधार कार्डमधील ही माहिती फक्त एकदाच अपडेट करता येते

2 Min Read
Aadhaar Update Rules Name Dob Gender Change Limit

Aadhaar Update Rules Name Dob Gender Change Limit : आधार कार्ड हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे ओळखपत्र आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाणारे हे कागदपत्र सरकारी योजना (Sarkari Yojana) व अनेक खासगी सेवांसाठी आवश्यक असते. आधार अपडेट प्रक्रियेसाठी UIDAI काही महत्त्वाचे नियम ठरवते, ज्यात काही माहिती अनेकदा अपडेट करता येते, तर काही फक्त एकदाच बदलता येते.

कोणती माहिती एकदाच अपडेट करता येते?

Aadhaar Rules: UIDAI च्या नव्या नियमानुसार, जन्मतारीख (Date of Birth) आणि लिंग (Gender) फक्त एकदाच अपडेट करता येईल. त्यामुळे, पहिल्यांदा अपडेट करताना योग्य माहिती द्यावी, अन्यथा चुकीच्या माहितीच्या आधारावरच काम करावे लागेल.

पत्ता किती वेळा बदलता येईल?

आधार कार्डमधील पत्ता (Address) कितीही वेळा अपडेट करता येतो. परंतु, जन्मतारीख किंवा लिंगात बदल करण्यासाठी फक्त एकच संधी मिळते.

चुकीची जन्मतारीख असल्यास काय करावे?

  • जर आधारमध्ये चुकीची जन्मतारीख नोंद झाली असेल, तर ती दुरुस्त करण्यासाठी फक्त एकदाच संधी मिळते.
  • जर पहिल्या वेळी चुकीचे अपडेट झाले, तर दुसऱ्यांदा बदल करता येणार नाही

आधार मध्ये लिंग बदलासाठी फक्त एकच संधी

  • आधार कार्डमध्ये चुकीच लिंग (Gender) नोंद झाला असल्यास, ते सुधारण्यासाठी फक्त एकदाच बदल करण्याची संधी मिळते.
  • जर पहिल्यांदा चुकीचे बदल झाले, तर ते कायम राहतील आणि आधार कार्ड पुन्हा अपडेट करता येणार नाही.

UIDAI च्या नव्या नियमांचे महत्व

UIDAI New Rules 2025 : UIDAI च्या नव्या नियमानुसार, आधारवरील जन्मतारीख आणि लिंग अपडेट करताना कागदपत्रांची शहानिशा व्यवस्थित करणे गरजेचे आहे. अन्यथा, चुकीच्या माहितीमुळे भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

आधार अपडेट करताना आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित तपासा आणि योग्य माहिती द्या. कारण जन्मतारीख व लिंग फक्त एकदाच बदलता येणार असल्यामुळे, तुमची एक छोटीशी चूकही आयुष्यभरासाठी अडचणींचे कारण बनू शकते.

Share This Article