Gold Price Hike 2025 India 1 Lakh : सध्या भारतात सोन्याचे दर सातत्याने वाढत आहेत. 1925 मध्ये फक्त 18.75 रुपये प्रति 10 ग्रॅम असलेले सोने 2025 मध्ये 88,000 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचले आहे. तज्ञांच्या मते, या वर्षअखेरीस सोने 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकते.
100 वर्षांत सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ
गेल्या 100 वर्षांत सोन्याच्या दरात (Gold Rate) मोठी वाढ झाली आहे. 1925 मध्ये 18.75 रुपये असलेला सोन्याचा दर 1947 मध्ये 88.62 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्यानंतर सतत दर वाढत गेले.
- 1955: 79.18 रुपये
- 1975: 540 रुपये
- 1995: 4,680 रुपये
- 2005: 7,000 रुपये
- 2015: 26,343 रुपये
- 2025: 88,000 रुपये
सोन्याचे दर वर्षअखेरीस 1 लाख होणार?
Gold Price Prediction 2025 India: तज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अस्थिरता, गुंतवणुकीचा कल आणि सोन्याची वाढती मागणी यामुळे सोन्याचे दर झपाट्याने वाढत आहेत. अनेक तज्ज्ञांच्या मते, डिसेंबर 2025 पर्यंत सोन्याचा दर 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम ओलांडू शकतो.
मध्यमवर्गीयांसाठी मोठी चिंता
सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे मध्यमवर्गीय खरेदीदारांसाठी मोठे आव्हान निर्माण झाले आहे. लग्नसराईच्या काळात वाढलेले दर सामान्य नागरिकांसाठी चिंता वाढवणारे आहेत.
सोन्यात गुंतवणूक करावी का?
सोन्यात गुंतवणूक (Gold Investment) करणाऱ्या लोकांसाठी हा योग्य काळ असल्याचे विश्लेषकांचे मत आहे. आगामी काही महिन्यांत सोन्याचे किंमती (Gold Price) आणखी वाढू शकतात, त्यामुळे सध्याच्या दरात खरेदी केल्यास चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.