Ladki Bahin Yojana Loan: वयोश्री योजना थांबली? ‘लाडक्या बहिणींसाठी’ राज्य सरकार काढतय दरमहा ‘इतक्या’ कोटींच कर्ज!

2 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Loan Vayoshri Yojana Update

Majhi Ladki Bahin Yojana Loan Vayoshri Yojana Update : राज्यातील वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री वयोश्री योजना (Mukhyamantri Vayoshri Yojana) सध्या ठप्प झाली असून, लाखो लाभार्थ्यांना तीन महिन्यांपासून आर्थिक मदत मिळालेली नाही. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यांसाठी राज्य सरकार दरमहा तब्बल ४,००० कोटींचे कर्ज उचलत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

वयोश्री योजनेचा लाभ का थांबला?

राज्य सरकारने ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री वयोश्री योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत ६५ वर्षांवरील नागरिकांना दरवर्षी ३,००० रुपये मदत जाहीर करण्यात आली होती. मात्र, १७ ऑक्टोबर २०२४ पासून नव्या अर्जदारांसाठी अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली, आणि योजनेच्या निधीअभावी सुमारे ४.०९ लाख लाभार्थ्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही.

दरमहा ४,००० कोटींच कर्ज का घेतल जातंय?

Ladki Bahin Yojana Loan: राज्य सरकार दरमहा विविध योजनांसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज घेत आहे. अहवालानुसार, गेल्या आठ ते दहा महिन्यांत महाराष्ट्र सरकारने तब्बल ९०,००० कोटींपर्यंत कर्ज घेतले आहे. यातील मोठा वाटा लाडकी बहिण योजना (३,७५० कोटी रुपये) आणि युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी (१५० कोटी रुपये) जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या तिजोरीत महसूल तुटवडा?

महाराष्ट्र सरकारला महिन्याला अंदाजे २८ ते ३० हजार कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असतो, मात्र प्रत्यक्षात फक्त २० हजार कोटी रुपये जमा होत असल्याने मोठा तुटवडा जाणवत आहे. परिणामी, वृद्धांना दिली जाणारी मदत थांबवण्यात आली आहे.

वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांचे काय होणार?

राज्यात ६.२५ लाख ज्येष्ठ नागरिकांनी वयोश्री योजनेसाठी अर्ज केला होता, मात्र आतापर्यंत फक्त २ लाख जणांनाच मदत मिळाली आहे. उर्वरित ४.०९ लाख लाभार्थी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत.

राज्य सरकारच्या निर्णयामुळे लाखो वृद्ध नागरिकांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. येत्या काळात वयोश्री योजना (Vayoshri Yojana 2025) पुन्हा सुरू होईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

🔴 हेही वाचा 👉 १५ फेब्रुवारीपासून रेशनकार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू! काही कार्डधारकांना रेशन मिळणे होऊ शकते बंद? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

Share This Article