Aadhaar Card Address Update Limit : आधार कार्ड हे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) द्वारे जारी केले जाते. हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी 12 अंकी ओळख क्रमांक असते. बँकिंग, सरकारी योजना, (Sarkari Yojana) शाळेत प्रवेश, गुंतवणूक यांसारख्या अनेक सेवांसाठी आधार आवश्यक आहे. मात्र, काहीवेळा आधार कार्डवर चुकीचा पत्ता नोंद असतो किंवा तो बदलण्याची गरज भासते. आधार कार्डमध्ये पत्ता किती वेळा अपडेट करता येईल? हा प्रश्न अनेकांना पडतो. त्याबद्दल जाणून घेऊयात…
आधार कार्डमध्ये किती वेळा पत्ता अपडेट करता येतो?
UIDAI ने आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्यावर कोणतीही मर्यादा घातलेली नाही. आपण हवे तितक्या वेळा आधार कार्डवरील पत्ता बदलू शकतो.
🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.
आधार कार्डमध्ये पत्ता कसा बदलायचा?
- जवळच्या आधार सेवा केंद्राला (Aadhaar Seva Kendra) भेट द्या.
- अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक माहिती द्या.
- बायोमेट्रिक पडताळणी (फिंगरप्रिंट/रेटिना स्कॅन) केली जाईल.
- पत्ता बदलण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
✔️ वीज बिल / टेलिफोन बिल
✔️ बँक स्टेटमेंट / पासबुक
✔️ रेशन कार्ड / पासपोर्ट
✔️ घराची रजिस्ट्री / भाडे करारपत्र
आधार कार्ड अपडेट करताना महत्त्वाच्या गोष्टी
✔️ पत्ता बदलल्यानंतर आधार कार्डची नवीन प्रिंट घ्या.
✔️ UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर (www.uidai.gov.in) स्टेटस तपासा.
✔️ चुकीचा पत्ता टाळण्यासाठी बरोबर कागदपत्रे सादर करा.
Aadhaar Card Address Update Limit: आधार कार्डमध्ये पत्ता बदलण्याची कोणतीही लिमिट नाही, त्यामुळे गरज असेल तेव्हा तो अपडेट करून घ्या!
🔴 हेही वाचा 👉 चोरी झालेला स्मार्टफोन ट्रॅक आणि ब्लॉक करण्यासाठी आता सरकारी सुविधा, घरबसल्या ट्रॅक करा.