Ration Card News Maharashtra : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची सूचना!

2 Min Read
Ration Card E Kyc Maharashtra 2025

मुंबई, 10 फेब्रुवारी 2025: Ration Card E Kyc Maharashtra 2025 – महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या धान्याचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे.

🔴 हेही वाचा 👉 दीड लाख लाभार्थी महिलांची माघार! जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ई-केवायसी न केल्यास लाभ बंद होणार!

Ration Card News : राज्यातील अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब योजना अंतर्गत रेशनकार्ड असलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या रेशनकार्डमधील सर्व सदस्यांचे ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही, त्यांचा पुढील काळात शिधा थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ई-केवायसी कशी करावी?

लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या शिधावाटप दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत:

  • आधार कार्ड (लाभार्थ्याचे)
  • शिधापत्रिका (राशनकार्ड)

शिधावाटप दुकानात उपस्थित राहून ई-केवायसी पॉस मशीनवर बायोमेट्रिक प्रमाणीकरण करून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.

🔴 हेही वाचा 👉 १५,००० रुपये + रोज ५०० रुपये मानधन + ट्रेनिंगसह मिळणार अनेक लाभ.

अंतिम मुदत लवकरच जाहीर होणार!

ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी सरकार लवकरच अंतिम तारीख जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी.

टीप: अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या शिधावाटप दुकानाशी संपर्क साधा.

🔴 हेही वाचा 👉 ‘हे’ लोक बनवू शकत नाहीत आयुष्मान कार्ड, पात्रता यादी तपासा.

Share This Article