Budget 2025 Income Tax TDS New Rules Marathi – केंद्र सरकारने बजेट 2025 मध्ये मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. नव्या कर प्रणालीत करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाखांवरून 12 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे, 1 कोटी लोकांना याचा फायदा होईल.
नव्या कर स्लॅबनुसार तुम्हाला किती टॅक्स भरावा लागेल?
नव्या कर प्रणालीनुसार 12.75 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. याशिवाय, 24.75 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्यांना सध्याच्या तुलनेत 1.10 लाख रुपयांची बचत होईल. सरकारने टीडीएस (TDS) आणि टीसीएस (TCS) च्या नियमांमध्येही मोठे बदल केले आहेत.
टीडीएस-टीसीएसमध्ये मोठा बदल – कुणाला फायदा?
- विदेशी शिक्षणासाठी कर्जावर टीसीएस लागू होणार नाही.
- विदेशात पाठवलेल्या 10 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर टीसीएस लागणार नाही.
- जेष्ठ नागरिकांसाठी असणारी 50,000 रुपयांच्या बचतीवरील टीडीएसची मर्यादा आता 1 लाख रुपये करण्यात आली आहे.
- भाड्यावरील टीडीएस 2.40 लाखांवरून 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आला आहे, त्यामुळे छोट्या घरमालकांना याचा फायदा होईल.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?.
जुनी कर प्रणाली संपुष्टात येणार?
सरकार जुनी कर प्रणाली हळूहळू बंद करण्याच्या तयारीत आहे. सध्या 75% करदाते नवीन कर प्रणाली स्वीकारत आहेत. त्यामुळे भविष्यात जुन्या कर प्रणालीत कोणताही बदल करण्यात येणार नाही.
बजेट 2025 मधील महत्त्वाचे ठळक मुद्दे:
✔️ 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त
✔️ 24.75 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1.10 लाखांची बचत
✔️ टीडीएस आणि टीसीएसमध्ये मोठे बदल
✔️ भाड्यावरील कर सवलतींमुळे छोट्या घरमालकांना फायदा
बजेट 2025 (Budget 2025) मधील या बदलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होईल अशी आशा आहे.
🔴 नोकरी 👉 आयकर विभाग भरती; लेखी परीक्षेशिवाय सरकारी नोकरीची संधी, त्वरित अर्ज करा.