Gold Silver Price Today 15 February 2025 : आज 15 फेब्रुवारी 2025 रोजी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. चांदीने लाखाचा टप्पा ओलांडला आहे. तर, सोन्यानेही चांगली वाढ नोंदवली आहे. ग्राहकांना या किंमतवाढीचा मोठा फटका बसला आहे.
सोन्याचा भाव 87,310 रुपयांवर
गेल्या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी वधारले होते. मात्र, त्यात नंतर 400 रुपयांची घसरण झाली. या आठवड्यात सोन्यात पुन्हा 1200 रुपयांची वाढ झाली. तर काही दिवसांत 700 रुपयांची घसरणही पाहायला मिळाली.
आज 22 कॅरेट सोन्याचा दर 80,005 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 87,310 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
चांदी पोहोचली 1,00,500 रुपयांवर
5 फेब्रुवारीला चांदीत 1000 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 14 फेब्रुवारीपर्यंत किंमती स्थिर होत्या. मात्र, व्हॅलेंटाईन डेला चांदीने जोरदार उसळी घेतली आणि लाखाचा टप्पा पार केला.
आज 1 किलो चांदीचा दर 1,00,500 रुपये झाला आहे.
Gold Price Today 15 February 2025 : इतर कॅरेटचे दर (IBJA नुसार)
- 24 कॅरेट सोने: ₹85,998 प्रति 10 ग्रॅम
- 23 कॅरेट सोने: ₹85,654 प्रति 10 ग्रॅम
- 22 कॅरेट सोने: ₹78,774 प्रति 10 ग्रॅम
- 18 कॅरेट सोने: ₹64,499 प्रति 10 ग्रॅम
- 14 कॅरेट सोने: ₹50,309 प्रति 10 ग्रॅम
घरबसल्या जाणून घ्या दर
जर तुम्हाला दररोजचे सोन्या-चांदीचे ताजे दर (Gold Rate Today) जाणून घ्यायचे असतील, तर इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे दर जाहीर करते. शनिवारी, रविवारी आणि सरकारी सुट्यांच्या दिवशी हे दर अपडेट केले जात नाहीत.
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे सोने आणि चांदीचे दर जाणून घेऊ शकतात.
🔴 हेही वाचा 👉 किती सुरक्षित आहेत तुमच्या बँक खात्यातील पैसे? जाणून घ्या महत्त्वाचे नियम.