Ladki Bahin Yojana : आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, जाणून घ्या सविस्तर

2 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiaries Verification And Grant Update 2025

Ladki Bahin Yojana Beneficiaries Verification And Grant Update: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. मात्र, या योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठीही अर्ज केले आहेत. यामुळे एकाच वेळी दोन योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची छाननी सुरू झाली आहे, आणि यामुळे अनेक महिलांचे दोन्ही योजनांचे हफ्ते थांबण्याची शक्यता आहे.

दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांची पडताळणी सुरू

महसूल विभागाकडून आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. ज्या महिलांनी या दोन्ही योजनांचा लाभ घेतला आहे त्यांचे अनुदान थांबवले जाईल. तसेच, शासनाने स्पष्ट केले आहे की इथून पुढे एकाच व्यक्तीला दोन योजनांचा लाभ घेता येणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहिण योजना आणि ‘या’ योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांकडून होणार वसुली.

अनेक महिलांनी अर्ज माघारी घेतले

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अनेक महिलांनी स्वेच्छेने ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी केलेले अर्ज (Ladki Bahin Yojana Form 2025) माघारी घेतले आहेत. महिलांनी स्वेच्छेने अर्ज मागे घेतल्याने त्यांना आत्तापर्यंत मिळालेल्या लाभाची रक्कमही परत करावी लागली नाही.

२५ जानेवारीपासून लाभ वितरण सुरू

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात २५ जानेवारीपासून जानेवारी महिन्याचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची पुष्टी झाली आहे.

काय होणार पुढे?

महिला व बालविकास विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची यादी (Ladki Bahin Yojana List 2025 Maharashtra) पुन्हा तयार केली जात आहे. एकाच वेळी दोन योजनांचा लाभ घेत आहेत अशा महिलांची पडताळणी सुरू आहे. यासाठी महसूल विभाग, महिला व बालविकास विभाग आणि जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जात आहे.

🔴 हेही वाचा 👉 Free Silai Machine Yojana Maharashtra 2025.

Share This Article