Ladki Bahin Yojana: जानेवारीचा सातवा हप्ता जमा झाला की नाही ‘अस’ तपासा!

2 Min Read
Ladki Bahin Yojana January Installment 2025

Ladki Bahin Yojana Status Check Maharashtra: महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi Ladki Bahin Yojana) पुन्हा एकदा चर्चेत आहे. जानेवारी २०२५ महिन्याचा हप्ता (Ladki Bahin Yojana January installment 2025) पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून, २४ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी २६ जानेवारीपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असे आश्वासन दिले आहे.

१५०० की २१०० रुपये?

सध्या पात्र महिलांना १५०० रुपयांचा सन्मान निधी मिळत असून, महिला व बालविकास खात्याने पुढील अर्थसंकल्प अधिवेशनात हा निधी २१०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्याची तयारी केली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर महिलांना दरमहा २१०० रुपये मिळू शकतील.

महिलांनी बँक बॅलन्स ‘असा’ तपासा

  • तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यास तुम्हाला एसएमएस प्राप्त होईल.
  • जर एसएमएस मिळाला नाही, तर बँकेच्या अधिकृत अॅपवर जाऊन बॅलन्स किंवा स्टेटमेंट तपासा.
  • बँकेचे अॅप नसल्यास, संबंधित बँकेत जाऊन स्टेटमेंट अपडेट करा.
  • पैसे न आल्यास, २६ जानेवारीपर्यंत प्रतीक्षा करावी.

योजनेतून अपात्र महिलांना वगळण्याची मोहीम सुरू

महिला व बालविकास विभागाने पात्रता निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यासाठी तपासणी मोहीम सुरू केली आहे. सरकारच्या तपासणीपूर्वीच राज्यभरातून ४,००० महिलांनी स्वतःहून योजनेतून माघार घेतली आहे. अपात्र ठरल्यास लाभाची रक्कम परत द्यावी लागेल या भीतीमुळे महिलांनी ‘योजना नको’ असे अर्ज केले आहेत.

महिला व बालविकास खात्याला निधी वितरित

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी महिला व बालविकास खात्याकडे ₹३,७०० कोटींचा निधी वितरित केल्याचे जाहीर केले होते. यामुळे योजनेचा सातवा हप्ता वेळेवर देणे शक्य झाले आहे.

भविष्यातील बदलांची शक्यता

सरकार पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी करून, या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच, निधी वाढवून अधिक महिलांना फायदा कसा मिळवून देता येईल यावरही विचार सुरू आहे.

महिलांसाठी ही योजना आर्थिक स्थैर्य मिळवून देणारी ठरत असून, यापुढील हप्ते वेळेवर मिळतील यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Share This Article