Maharashtra Board Exam 2025 SSC HSC Copy Cas Strict Action : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मागील पाच वर्षांत (2018-2024) ज्या परीक्षा केंद्रांवर कॉपीचे प्रकार आढळले आहेत, तिथे बाहेरच्या शाळांतील केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
10th SSC Board exam 2025: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी 2025 पासून सुरू होईल, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2025 पासून होणार आहे. परीक्षेदरम्यान कोणतीही गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी राज्य मंडळाने कडक पावले उचलली आहेत.
मंडळाने 17 जानेवारी 2025 रोजी चक्रीकार पद्धतीने केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षक नेमण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर 29 जानेवारी 2025 रोजी त्यात बदल करण्यात आले. नवीन नियमानुसार, कोविड काळ वगळता मागील पाच वर्षांत ज्या केंद्रांवर गैरप्रकार आढळले, तिथेच बाहेरच्या शाळांतील शिक्षकांची नियुक्ती होईल.
कॉपी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना
- कॉपी झालेल्या परीक्षा केंद्रांवर बाहेरचे केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षक असतील.
- विभागीय शिक्षण मंडळ परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सज्ज आहे.
- परीक्षेच्या काळात सतत निरीक्षण आणि कडक नियम अंमलात आणले जातील.
राज्यातील लाखो (Maharashtra Board Exam 2025 SSC HSC) विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता राहावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.