Maharashtra Government Job Anganwadi Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागात मोठी भरती होणार आहे. १४ फेब्रुवारी २०२५ पासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ही भरती होणार असून, ५६३९ अंगणवाडी सेविका आणि १३,२४३ अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यात येणार आहेत.
महिला उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
Maharashtra Government Job Anganwadi Recruitment 2025 : राज्यातील महिलांसाठी ही मोठी संधी आहे. राज्याच्या गृहविभागात भरती झाल्यानंतर आता महिला व बालविकास विभागात भरती होत आहे. मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी याबाबत माहिती दिली असून, भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असेल, असे सांगितले आहे.
भरती प्रक्रियेचे संपूर्ण विवरण
- भरती विभाग: महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र
- एकूण पदे: १८,८८२
- अंगणवाडी सेविका: ५६३९ पदे
- अंगणवाडी मदतनीस: १३,२४३ पदे
- अर्ज सुरू होण्याची तारीख: १४ फेब्रुवारी २०२५
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: २ मार्च २०२५
- निवड प्रक्रिया: सरळ सेवा भरती
रिक्त पदे आणि इतर भरती प्रक्रिया
महिला व बालविकास विभागांतर्गत राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळातील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
महिला बचत गटांसाठी योजना
राज्यातील ५५३ बाल विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत १,१०,५९१ अंगणवाडी केंद्रे कार्यरत आहेत. महिला बचत गटांसाठी अदर्श कम्युनिटी किचन योजना लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
🔴 हेही वाचा 👉 RBI ची मोठी घोषणा! लवकरच जारी होणार ५० रुपयांची नवी नोट.
महत्त्वाची सूचना
भरती प्रक्रियेत कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरून संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करा.
Maharashtra Government Job Anganwadi Recruitment 2025 ही सुवर्णसंधी दवडू नका! लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 EPFO News Today : पीएफ धारकांसाठी महत्वाची बातमी.