Ration Card E-KYC Update Maharashtra 2025 : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. अन्यथा रेशनकार्डमधून नाव वगळले जाईल आणि शासकीय धान्याचा पुरवठा बंद होईल. पुरवठा विभागाने चौथ्यांदा मुदतवाढ दिली असली तरी अद्याप हजारो लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 ‘या’ नागरिकांना आता रेशनऐवजी थेट पैसे; सरकारचा नवा निर्णय लागू.
रेशन ई-केवायसी का आवश्यक आहे?
ई-केवायसी म्हणजे आधार कार्डच्या मदतीने लाभार्थ्यांची ओळख पडताळणी प्रक्रिया. या प्रक्रियेमुळे बोगस रेशनकार्डधारकांना ओळखता येते आणि फक्त पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळते. आधार क्रमांक आणि रेशनकार्ड लिंक करणे आवश्यक असून, हे न केल्यास लाभ थांबेल.
ई-केवायसीसाठी कोणती कागदपत्रे लागतात?
रेशनकार्ड ई-केवायसी करण्यासाठी फक्त आधार कार्ड आणि रेशनकार्ड आवश्यक आहे. ही प्रक्रिया रेशन दुकानातील पॉस (POS) मशीनद्वारे केली जाते. लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
रेशनकार्डवर नाव कायम ठेवायचय? तर मग लगेच ई-केवायसी करा!
Ration Card E-KYC Maharashtra Last Date: 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास रेशनकार्ड मधून नाव वगळले जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता, त्वरित ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा शासकीय धान्य मिळण्यास अडथळा येऊ शकतो.
लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आधार आणि रेशनकार्डसह ई-केवायसी करावी.
🔴 नोकरी 👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार.