Ration Card Name Add Online Maharashtra : रेशन कार्डमध्ये नाव जोडणे किंवा काढून टाकण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी झाली आहे. भारत सरकारच्या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने ‘मेरा रेशन 2.0’ अॅपचे (Mera Ration 2.0 App) नवीन अपडेट जारी केले आहे. या अपडेटमुळे लाभार्थी घरबसल्या त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित बदल करू शकतात.
रेशन कार्डमध्ये नाव जोडण्याची किंवा काढण्याची प्रक्रिया
Ration Card New Name Add Online Maharashtra : रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी ‘मेरा रेशन 2.0’ अॅप डाऊनलोड करा. हे अॅप Android आणि iPhone दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
- अॅप डाउनलोड करा – Android वापरकर्ते Google Play Store आणि iPhone वापरकर्ते App Store वरून ‘Mera Ration 2.0’ अॅप डाऊनलोड करू शकतात.
- OTP व्हेरिफिकेशन करा – आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून OTP व्हेरिफाय करा.
- रेशन कार्ड अपडेट करा –
- नवीन कुटुंबातील सदस्याचे नाव जोडा.
- गरज नसलेल्या सदस्याचे नाव काढा.
- जुनी माहिती सुधारित करा.
- विनंती सबमिट करा – तुमच्या विनंतीची पूर्तता संबंधित जिल्ह्याच्या अन्न पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल.
सरकारी कार्यालयांना भेट देण्याची गरज नाही!
Ration Card Name Registration : यापूर्वी रेशन कार्डमध्ये बदल करण्यासाठी लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांत अनेकदा जावे लागत होते. मात्र, ‘मेरा रेशन 2.0’ अॅपच्या नव्या सुविधेमुळे आता कोणत्याही कागदपत्रांची प्रत्यक्ष पूर्तता करण्याची गरज नाही. संपूर्ण प्रक्रिया मोबाईलद्वारे काही मिनिटांत पूर्ण करता येते.
रेशन कार्ड अपडेटसाठी कोणत्या गोष्टी आवश्यक?
- आधार क्रमांक
- नोंदणीकृत मोबाईल नंबर
- अॅपमध्ये लॉगिन करणे आवश्यक
रेशन कार्डशी संबंधित कोणतेही अपडेट घरी बसून करा!
मेरा रेशन अॅप मुळे आता कोणत्याही सरकारी कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष फॉर्म भरावा लागणार नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांचा वेळ वाचणार आहे. नवीन अपडेटमुळे लाखो कुटुंबांना थेट मोबाईलवरूनच रेशन कार्ड अपडेट (Ration Card Update) करण्याची सुविधा मिळाली आहे.
रेशन कार्ड अपडेट करण्यासाठी त्वरित ‘Mera Ration 2.0 App 2025’ अॅप डाऊनलोड करा आणि प्रक्रिया सुरू करा!