Mukhyamantri Annapurna Yojana Free Gas Cylinder Rules : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षातून तीन मोफत एलपीजी गॅस सिलेंडर मिळणार आहेत. मात्र, यासाठी काही महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत. घरातील गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर नसेल, तर या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर आहे, यावर योजनेचा लाभ अवलंबून असेल.
फक्त उज्ज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनाच फायदा
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला पंतप्रधान उज्ज्वला योजना (PM Ujjwala Yojana) किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी असणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या महत्त्वाच्या अटी
▶ गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर असणे गरजेचे आहे.
▶ पंतप्रधान उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला पात्र.
▶ लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेले कुटुंब पात्र ठरेल.
▶ फक्त १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरसाठी ही योजना लागू असेल.
▶ एका रेशनकार्डवरील केवळ एक सदस्य या योजनेस पात्र राहील.
▶ ३१ जुलै २०२४ पूर्वीच्या गॅस कनेक्शनधारक महिलांनाच लाभ मिळेल.
महिलांनी काय करावे?
तुमच्या नावावर गॅस कनेक्शन नसल्यास, आता ते हस्तांतरित करून उपयोग होणार नाही. कारण सरकारने ३१ जुलै २०२४ पर्यंतच्या गॅस कनेक्शनधारक महिलांनाच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी (Mukhyamantri Annapurna Yojana) पात्र मानले आहे. त्यामुळे भविष्यातील योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी आपले गॅस कनेक्शन, बँक खाते आणि इतर महत्त्वाच्या मालमत्तांवर स्वतःच्या नावाची नोंदणी करून घ्यावी.
🔴 हेही वाचा 👉 अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यात अजून का जमा झाले नाहीत पैसे.