Ladki Bahin Yojana Hingoli Fraud Case,: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) हिंगोली जिल्ह्यात मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. चार पुरुषांनी महिलांच्या नावाने अर्ज भरून सहा हप्ते घेतल्याचे समोर आले आहे. ही धक्कादायक माहिती लाभ बंद करण्यासाठी आलेल्या अर्जांमधून स्पष्ट झाली आहे.
योजनेतील हा गैरप्रकार कसा उघडकीस आला?
राज्यातील अनेक महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mazi Ladki Bahin Yojana) अर्ज सादर केले होते. हिंगोली जिल्ह्यातील एकूण 3.50 लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी शासनाने अपात्र महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्याचे आवाहन केले होते, लाभ बंद करण्यासाठी 8 जणांनी अर्ज केले, पण त्यातील 4 पुरुष निघाले.
पुरुषांनी महिलांचे फोटो लावून घेतला लाभ?
Hingoli News: पुरुषांनी आधारकार्डवर महिलांचे फोटो लावून अर्ज भरले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या बँक खात्यावर योजनेचे सहा हप्ते जमा झाले आहेत. या गैरव्यवहारात औंढा नागनाथ तालुक्यातील महेश भांडे, रामराव काळे, गजानन काळे आणि शिवाजी भांडे या चार जणांचा समावेश आहे.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेतून 1 रुपयाही न मिळालेल्या महिलांसाठी सरकारचा मोठा निर्णय!.
आता पुढे काय होणार?
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून फसवणूक करणाऱ्यांवर लवकरच कठोर कारवाई केली जाणार आहे. संबंधित खात्यांमध्ये चुकीने पैसे गेले की जाणूनबुजून फसवणूक केली गेली, याचा तपास केला जात आहे. शासनाच्या निर्देशानुसार पुढील *कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. सरकारने गरजू महिलांना मदत करण्यासाठी ही योजना सुरू केली, मात्र काहीजण फसवणुकीचा मार्ग अवलंबत आहेत. त्यामुळे आता शासन या योजनेतील गैरप्रकार थांबवण्यासाठी नवे उपाय योजण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच! अर्ज प्रक्रिया सुरू, त्वरित करा नोंदणी.