Sarkari Naukri, RRB Group D Recruitment 2025 : रेल्वे भर्ती बोर्डाने (RRB) 23 जानेवारी 2025 पासून रेल्वे ग्रुप डी भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीत 32,438 पदांसाठी संधी उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवार 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 या कालावधीत संधी दिली जाणार आहे.
पदसंख्या आणि विभागानुसार जागा
या भरती अंतर्गत विविध विभागांमध्ये 32,438 पदे भरली जाणार आहेत. पदसंख्या खालीलप्रमाणे आहे:
- ट्रॅक मेंटेनर ग्रेड IV – 13,187 पदे
- पॉईंट्समॅन-बी – 5,058 पदे
- सहायक ट्रॅक मशीन – 799 पदे
- सहायक ब्रिज – 301 पदे
- सहायक (C&W) – 2,587 पदे
- सहायक लोको शेड डिझेल – 420 पदे
- सहायक वर्कशॉप (मेकॅनिक) – 3,077 पदे
- सहायक (S&T) – 2,012 पदे
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- संबंधित क्षेत्रातील ITI डिप्लोमा आवश्यक.
- अधिक माहितीसाठी अधिकृत अधिसूचना तपासा.
🔴 नोकरी 👉 अर्ज करण्यासाठी फक्त 9 दिवस शिल्लक! ‘या’ चुका टाळा.
वयोमर्यादा
- किमान वय – 18 वर्षे
- कमाल वय – 36 वर्षे (01 जानेवारी 2025 नुसार)
- आरक्षित प्रवर्गासाठी शासकीय नियमांनुसार सवलत लागू.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यात होईल:
- संगणक आधारित परीक्षा (CBT)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- कागदपत्र पडताळणी (DV)
- वैद्यकीय चाचणी
अर्ज फी
- सामान्य, OBC आणि EWS प्रवर्ग – ₹500
- SC, ST, महिलांसाठी – ₹250
- CBT परीक्षेनंतर OBC, EWS, सामान्य वर्गाला ₹400 आणि इतर आरक्षित प्रवर्गाला संपूर्ण ₹250 परत केले जातील.
RRB Group D Recruitment 2025 ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- RRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- ग्रुप डी भरती नोटिफिकेशन उघडा.
- “Apply Online” वर क्लिक करा.
- सर्व आवश्यक माहिती भरा.
- फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- शुल्क भरून अंतिम सबमिशन करा.
- अर्जाची प्रिंटआउट घ्या आणि सुरक्षित ठेवा.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू – 23 जानेवारी 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख – 22 फेब्रुवारी 2025
- फॉर्ममध्ये सुधारणा करण्याची अंतिम मुदत – 6 मार्च 2025
महत्वाची सूचना: इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर (RRB Group D Recruitment 2025) साठी अर्ज करावा, कारण शेवटच्या दिवशी सर्व्हरवर लोड वाढतो आणि तांत्रिक अडचणी येऊ शकतात. अधिकृत अधिसूचना संपूर्ण वाचूनच अर्ज करा.
✔️ महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार!.