रुपयाची किंमत झाली कमी, सार्वकालिक नीचांकी पातळीवर भारतीय रुपया Rupee Hits All Time low Against Dollar

1 Min Read
Rupee Hits All Time low Against Dollar

मुंबई, 10 फेब्रुवारी 2025: Rupee Hits All Time low Against Dollar – भारतीय रुपया आज आणखी घसरला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने घसरण सुरू असून, आज भारतीय रुपया 87.92 रुपयांवर पोहोचला.

रुपयाच्या घसरणीची कारणे

Indian Rupee Hits All Time Low Against The US Dollar : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्टील आणि अॅल्युमिनिअमच्या आयातीवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे डॉलर मजबूत होत आहे. परिणामी, विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून पैसे काढत आहेत.

आरबीआयच्या निर्णयाचा परिणाम नाही

7 फेब्रुवारी रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर 6.25% केला. मात्र, या निर्णयाचा रुपयाच्या दरावर कोणताही सकारात्मक परिणाम दिसून आला नाही. रुपयाची घसरण कायम आहे.

🔴 हेही वाचा 👉 रेपो रेट कपातीनंतर मोठा निर्णय, गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील ईएमआय कमी होणार.

विदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय

गेल्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात पैसे काढले आहेत. डिसेंबरमध्ये 15,000 कोटी, जानेवारीत 78,000 कोटी, तर फेब्रुवारीत आतापर्यंत 7,000 कोटी रुपये बाहेर काढण्यात आले.

पुढील स्थिती काय?

रुपयाची घसरण रोखण्यासाठी आरबीआय आणि सरकार कोणती पावले उचलतात, याकडे बाजाराचे लक्ष असेल. पुढील काही दिवसांत डॉलरच्या हालचालींवर रुपयाची स्थिरता अवलंबून राहील.

🔴 हेही वाचा 👉 सरकार बंद करणार 3 महत्त्वाच्या सरकारी योजना? मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा.

Share This Article