Ration Card News : 28 फेब्रुवारीनंतर ‘या’ शिधापत्रिकाधारकांना धान्य मिळणे बंद!

1 Min Read
E-KYC Ration Card Update February 2025

E-KYC Ration Card Update February 2025 : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना 28 फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी करण्याचे शासनाने बंधनकारक केले आहे. शिधापत्रिकेतील व्यक्तींची मुदतित ई-केवायसी न झाल्यास शिधापत्रिकेतील नावे वगळण्यात येणार असून, त्या कुटुंबांना धान्य मिळणार नाही. त्यामुळे तातडीने शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी. (The Ration card E-KYC deadline is February 28, 2025. Non-compliance may remove names from ration cards, stopping food supply. Complete E-KYC now to avoid issues).

Ration Card News : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. मुदतीत प्रक्रिया पूर्ण न केल्यास शिधापत्रिकेतील नावे वगळली जातील. त्याचबरोबर रेशन दुकानदारांनाही ई-केवायसी पूर्ण नसणाऱ्यांना धान्य दिल्यास अडचण येऊ शकते.

“ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. त्यामुळे ज्यांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केली नाही, त्यांनी तातडीने करून घ्यावी. अन्यथा ज्यांची ई-केवायसी झालेली नाही, त्यांची नावे शिधापत्रिकेतून वगळली जातील व त्यांना धान्य मिळणार नाही.”

म्हणूनच शिधापत्रिकाधारकांनी आपापल्या कुटुंबातील सदस्यांची ई-केवायसी (Ration Card E-KYC) झालेली आहे का, हे तपासून लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी.

🔴 हेही वाचा 👉 Free Cycle Scheme Maharashtra: या योजनेतून शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल.

Share This Article