रेपो रेट कपातीनंतर मोठा निर्णय, गृहकर्ज आणि वाहन कर्जावरील ईएमआय कमी होणार? Home Loan EMI Reduction Repo Rate Cut

3 Min Read
Home Loan EMI Reduction Repo Rate Cut

Home Loan EMI Reduction Repo Rate Cut : गृहकर्जदारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच पतधोरण बैठक घेतली आणि तब्बल पाच वर्षांनंतर रेपो दरात 0.25 टक्क्यांची कपात केली. त्यामुळे रेपो रेट आता 6.25 टक्क्यांवर आला आहे. या निर्णयामुळे होम लोन आणि वाहन कर्जाचे व्याजदर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. (RBI cuts repo rate after 5 years, raising hopes for lower home loan and auto loan EMIs. Banks may reduce interest rates soon. Check latest updates on loan benefits).

🔴 हेही वाचा 👉 ऑनलाइन फसवणूक झाली आहे का? लगेच या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा, पैसे परत मिळण्याची संधी.

रेपो रेट कपात आणि त्याचा परिणाम

बहुतांश गृहकर्जे फ्लोटिंग व्याजदरावर आधारित असतात. म्हणजेच, रेपो दर कमी झाल्यास कर्जाचे व्याजदरही कमी होतात. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्जाच्या ईएमआयमध्ये कपात होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्वरित व्याजदर कमी होईल का याबाबत संभ्रम आहे.

बँका कधी घेतील मोठा निर्णय?

रेपो दर कपातीनंतर बँकांकडून कर्जदर कमी होण्यास 3 ते 6 महिने लागू शकतात. कारण, या काळात बँकांना ठेवींचे संकलन वाढवून पुरेशी रोकड (Liquidity) मिळवावी लागेल. त्यानंतरच बँका गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे दर कमी करू शकतात.

🔴 हेही वाचा 👉 भारतीय नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटणार? RBI च स्पष्टीकरण.

आर्थिक धोरण आणि सरकारचा प्रयत्न

काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्राप्तीकर सवलत 12 लाखांपर्यंत वाढवली. यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसा येईल आणि खर्च वाढेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यानंतरच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात रेपो दर कपात करण्याचा निर्णय घेतला.

रेपो रेट कमी झाल्याने नेमक काय होईल?

  • गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता
  • मासिक ईएमआयचा भार कमी होऊ शकतो
  • अर्थव्यवस्थेला गती मिळेल
  • लोकांची क्रयशक्ती वाढेल

🔴 हेही वाचा 👉 येत्या 10 महिन्यात सोन्याची किंमत किती वाढेल? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत.

बँकांचा पुढचा निर्णय महत्त्वाचा

रेपो रेट कमी झाल्याने बँकांवर व्याजदर कपातीचा दबाव वाढला आहे. मात्र, बँका याचा फायदा कर्जदारांना देतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील काही महिन्यांत बँकांकडून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.

🔴 हेही वाचा 👉 RBI ची मोठी कारवाई! न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक मंडळ बरखास्त!.

Share This Article