Ladki Bahin Yojana: मुंबईतील 22 हजार महिलांचे अर्ज बाद? अर्ज पुन्हा सबमिट करण्याची संधी मिळणार

2 Min Read
{"Ladki Bahin Yojana 22 Thousand Women Application Rejected":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1,"remove_bg":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

मुंबई: 4 फेब्रुवारी 2025 – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील तब्बल 22 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. अर्ज अपूर्ण असल्याने किंवा चुकीची माहिती भरल्याने हे अर्ज बाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अनेक महिलांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

22 हजार महिलांचे अर्ज का झाले बाद?

महिला आणि बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार, अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे योग्य स्वरूपात सादर न केल्याने किंवा माहिती चुकीची भरल्याने अर्ज नाकारण्यात आले आहेत. सरकारने या प्रकरणाची तपासणी सुरू केली असून काही महिलांना त्रुटी दूर करून पुन्हा अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख जवळ आली!

लाडकी बहीण योजनेसाठीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपूर्ण आहेत, त्यांनी दिलेल्या वेळेत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात दुरुस्ती करावी. अन्यथा, फेब्रुवारी महिन्यानंतर त्यांना माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ मिळणार नाही.

फेब्रुवारीचा आठवा हप्ता कधी जमा होणार?

दरमहा पात्र महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 अनुदान जमा होते. लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर जमा होणार आहे. राज्यातील गरीब आणि आर्थिक दुर्बल महिलांसाठी ही योजना महत्त्वाची ठरत आहे.

अन्य योजनांतील महिलांना याचा फटका?

मुंबईतील 2724 महिला सध्या संजय गांधी निराधार योजना आणि 1127 महिला श्रावण बाळ योजनेचा लाभ घेत आहेत. या महिलांनाही लाडकी बहीण योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे, मात्र, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची यावर अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही.

महिलांनी काय करावे?

  • अर्जामध्ये योग्य माहिती भरा आणि कागदपत्रे पूर्ण करा.
  • अंतिम मुदतीपूर्वी तपासणी करून अर्ज सबमिट करा.
  • लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती किंवा तक्रारीसाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साध.

अर्ज अपात्र ठरल्यास चिंता करू नका, लवकरच अर्जात आवश्यक सुधारणा करून अर्ज पुन्हा सबमिट करण्याची संधी दिली जाणार आहे.

🔴 हेही वाचा 👉 4 फेब्रुवारी 2025 रोजीचे सोन्या-चांदीचे नवीन दर येथे जाणून घ्या.

Share This Article