दिवसेंदिवस घटू लागली लाडक्या बहिणींची संख्या! विरोधक आक्रमक, सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Ladki Bahin Yojana Beneficiary List Update 2025

2 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiary List Update 2025

Ladki Bahin Yojana Beneficiary List Update 2025 : महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींची संख्या घटत असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या एका महिन्यात तब्बल ५ लाख महिलांची नोंदणी बाद करण्यात आली आहेत. यामुळे विरोधक आक्रमक झाले असून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

महिला व बालकल्याण मंत्र्यांचे स्पष्टीकरण

राज्यातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केली. या योजनेअंतर्गत दर महिन्याला १५०० रुपये देण्याची तरतूद आहे. परंतु, अनेक अपात्र महिलांनी लाडकी बहीण योनेचा खोटी माहिती देऊन लाभ घेतल्याचे स्पष्ट झाल्याने अपात्र महिलांची छाननी करण्याचे काम सुरू आहे. असे महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले.

त्यांनी सांगितले की, चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेले किंवा निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द केले जात आहेत. तसेच, महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे का, याची अंगणवाडी सेविकांमार्फत तपासणी केली जात आहे.

संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल

Maharashtra News: विरोधी पक्षाने लाडकी बहीण योजनेतील बदलांवर टीका करत सरकारवर निशाणा साधला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीवर टीका करत म्हटले, “सरकारकडे पैसे नाहीत, निवडणुका संपल्या आहेत. निवडणूक होई पर्यंत महिलांना पैसे दिले गेले, पण आता सरकारला भार कमी करायचा आहे.”

संजय राऊत यांनी दावा केला आहे की, नीती आयोग आणि वित्तीय संस्थांनीही लाडकी बहीण योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आकडेवारी समोर – ५ लाख महिलांचे अर्ज रद्द

डिसेंबर २०२४ मध्ये माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojana) लाभार्थींची संख्या २.४६ कोटी होती. मात्र, जानेवारी २०२५ मध्ये हा आकडा २.४१ कोटींवर पोहोचला आहे. म्हणजेच एका महिन्यात ५ लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.

विरोधकांची पत्रकार परिषद

याच पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये विरोधी पक्षनेते (Rahul Gandhi) राहुल गांधी, सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि संजय राऊत यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भातील घोटाळ्यांचे पुरावे सादर केले जातील, असा दावा त्यांनी केला आहे.

🔴 हेही वाचा 👉 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना पुन्हा सुरू – अयोध्या दर्शनाची संधी! त्वरीत करा अर्ज,.

Share This Article