Ladki Bahin Yojana: ‘या’ महिलांचा हप्ता बंद, तर पात्र महिलांना नियमित मदत – अदिती तटकरे

2 Min Read
Ladki Bahin Yojana Beneficiary Verification Update Aditi Tatkare

मुंबई | 7 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana Beneficiary Verification Update Aditi Tatkare – लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ज्या महिलांचे अर्ज पात्रतेच्या निकषात बसत नाहीत, फेब्रुवारी पासूनच त्यांचा हप्ता बंद होण्याची शक्यता मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

योजनेचा सातवा हप्ता जमा, फेब्रुवारीचा हप्ता लवकरच

राज्यातील गरीब महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली. योजनेअंतर्गत दर महिन्याला 1,500 रुपये लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. आतापर्यंत 7 हप्ते जमा झाले आहेत. आणि फेब्रुवारीचा हप्ता लवकरच जमा होणार आहे.

अर्जांची पुन्हा पडताळणी

सरकारने योजनेसाठी ठराविक आर्थिक निकष निश्चित केले आहेत. मात्र, अनेक अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सर्व अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. अपात्र ठरणाऱ्या महिलांचा या महिन्यापासूनचा हप्ता बंद होऊ शकतो.

काय म्हणाल्या अदिती तटकरे?

मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्पष्ट केले की, “लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून क्रॉस व्हेरिफिकेशन सुरू आहे. मागील महिन्यातही डिफॉल्टर्स आढळले होते. शासनाच्या निकषांमध्ये बसत नसलेल्या महिलांना योजनेतून वगळण्यात येईल.”

या महिलांचा लाभ बंद!

  • ज्यांनी दोन वेळा अर्ज केले आहेत.
  • ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहे.
  • ज्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.

जर कोणी योजनेच्या अटी बदलल्यानंतर निकषात बसत नसेल, तर त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. यामुळे राज्यातील अनेक महिलांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 महिलांचे फोटो लावून पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ? असा उघडकीस आला गैरप्रकार,.

पात्र महिलांसाठी योजना सुरूच राहणार

अदिती तटकरे यांनी सांगितले की, योजनेत पात्र असलेल्या महिलांना दरमहा 1,500 रुपयांचा हप्ता मिळतच राहील. शासन निर्णयानुसार पुढील प्रक्रिया सुरू आहे.

माझी लाडकी बहीण योजनेतील (Mazi Ladki Bahin Yojana) गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अपात्र महिलांचा हप्ता बंद होईल, तर पात्र महिलांना नियमित मदत मिळत राहील. त्यामुळे योजना सुरू राहणार की नाही, याबाबतच्या अफवा पसरवणे थांबवण्याचेही सरकारने आवाहन केले आहे.

🔴 हेही वाचा 👉 बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच! अर्ज प्रक्रिया सुरू, त्वरित करा नोंदणी.

Share This Article