या लाडक्या बहिणींना आता मिळतील फक्त ५०० रुपये, या यादीत तुमच नाव तर नाही? Ladki Bahin Yojana Maharashtra

1 Min Read
Ladki Bahin Yojana Maharashtra 500 Rupees Update

Ladki Bahin Yojana Maharashtra 500 Rupees Update : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट आली आहे. सुमारे ५-६ लाख महिलांना आता लाडकी बहिण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana News: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळतात. परंतु, नामो शेतकरी महासन्मान योजनेचा (Namo Shetkari Yojana) लाभ घेणाऱ्या महिलांना आधीच १००० रुपये मिळतात. त्यामुळे, शासनाने लाडकी बहिण योजनेच्या निधीतून त्यांना फक्त ५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

किती महिलांवर होईल परिणाम?

सुमारे ५-६ लाख महिलांना याचा थेट फटका बसणार आहे. जर तुम्हीही नामो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुम्हालाही आता फक्त ५०० रुपये मिळतील.

राज्याच्या तिजोरीवर येत असलेला अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करत आहे. दोन योजनांतून एकाच वेळी आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांवर मर्यादा आणली जात आहे**.

  • नामो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थींना लाडकी बहिण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळतील.
  • राज्यातील ५-६ लाख महिलांवर याचा परिणाम होणार आहे.
  • शासनाचा उद्देश आहे की एकाच महिलेला दोन योजनांमधून १५०० रुपयांपेक्षा जास्त आर्थिक लाभ मिळू नये.

🔴 नोकरी 👉 महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आधार सेवा केंद्रात नोकरीची संधी, २८ फेब्रुवारीपर्यंत करा अर्ज.

Share This Article