Ladki Bahin Yojana Latest News Today In Marathi: लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असणाऱ्या महिलांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांकडून मिळालेला लाभ शासन सक्तीने परत घेत नसल्याचा खुलासा महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आला आहे. (No compulsion on women to return benefits under Ladki Bahin Yojana. Maharashtra Women’s Welfare Department clarifies false claims, urging reliance on official updates).
मुंबई, दि. 27: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे की, या योजनेतील लाभार्थी महिलांकडून मिळालेला लाभ शासन सक्तीने परत घेत नाही. यासंदर्भात समाजमाध्यमांवर आणि काही माध्यमांमध्ये चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार, काही महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तींनुसार पात्र नसल्याने स्वतःहून लाभाची रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, ज्या महिलांना पुढील लाभ घेण्याची इच्छा नाही, त्यांनी शासनाला स्वेच्छेने कळविले आहे. अशा महिलांच्या विनंतीचा आदर करून त्यांना पुढील लाभ दिला जाणार नाही.
सक्तीचे दावे खोटे!
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत रक्कम परत करण्याबाबत महिलांवर कोणतीही सक्ती शासनाकडून करण्यात आलेली नाही, हे महिला व बालविकास सचिवांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. तसेच लाभ मिळत असलेल्या महिलांवर अर्ज मागे घेण्याबाबत कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नाही.
🔴 हेही वाचा 👉 आता ‘या’ लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत 1500 रुपये, जाणून घ्या सविस्तर.
महिला आणि बालविकास विभागाची भूमिका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हेतू राज्यातील गरजू महिलांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे. चुकीच्या माहितीमुळे महिलांमध्ये गैरसमज पसरू नये, यासाठी महिला व बालविकास विभागाकडून हा खुलासा करण्यात आला आहे.