मोठी बातमी! पुण्यातील 75 हजारांहून अधिक लाडक्या बहिणींकडे चारचाकी! प्रशासनाने घेतला मोठा निर्णय Ladki Bahin Yojana

2 Min Read
Ladki Bahin Yojana Pune 75 Thousand Women Four Wheeler Verification

Ladki Bahin Yojana Pune 75 Thousand Women Four Wheeler Verification : महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) या योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची पडताळणी मोहीम सुरू झाली आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घराघरात जाऊन प्रशासन सत्यस्थिती जाणून घेणार आहे. खास करून सध्या चारचाकी वाहन असलेल्या लाभार्थ्यांची तपासणी केली जात आहे.

महिला आणि बालकल्याण विभागाने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔴 हेही वाचा 👉 चारचाकी आहे, तर नाही मिळणार लाडकी बहीण योजनेचा हफ्ता, येथे जाणून घ्या नवीन पात्रता निकष.

Pune News: पुणे जिल्ह्यातुन एक मोठी माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील 75 हजारांहून अधिक महिला लाभार्थ्यांकडे चारचाकी वाहन आहे. त्यामुळे या महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही.

राज्य सरकारने परिवहन विभागाकडून कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या याद्या मागवून त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या आहेत. यादीनुसार प्रशासन त्यावर तपासणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच, राज्यातील 21 ते 65 वर्षे वय असलेल्या महिलांना योजनेचा लाभ दिला जाते, परंतु त्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिलांची यादी आता तयार केली जात आहे.

महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव यांनी अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन चारचाकी वाहन असणाऱ्या महिलांच्या तपासणीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता तपासणीचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

माझी लाडकी बहीण योजनेचा (Mazi Ladki Bahin Yojana) लाभ खऱ्या गरजू लाभार्थ्यांना मिळावा यासाठी प्रशासनाने कडक पाऊले उचलन्यास सुरुवात केली आहे. शासनाने हा निर्णय घेणे आवश्यक होते, जेणेकरून फक्त योग्य पात्र महिलांनाच लाभ मिळावा आणि योजनेचे राज्यातील गरीब महिलांना लाभ देण्याचे उद्दीष्ट साध्य व्हावे.

🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन बॉयफ्रेंड फरार! मला नको रे सोडू….

Share This Article