Ladki Bahin Yojna Fraud Fake Applications: लातूर, सांगली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या नावाने लॉगिन आयडी बनवून उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील लाभार्थ्यांचे घुसखोरीचे रॅकेट उघड!
Ladki Bahin Yojna News Today: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. परराज्यातील हजारो बनावट लाभार्थ्यांनी बोगस लॉगिनद्वारे अर्ज दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. लातूर आणि सांगली जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका असल्याचे दाखवत बनावट लॉगिन आयडी तयार करून तब्बल 1171 बनावट अर्ज भरले गेले. विशेष म्हणजे, हे अर्ज दाखल करणारे लाभार्थी महाराष्ट्रातील नसून उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमधील असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
बोगस लाभार्थ्यांचे नेटवर्क कसे कार्यरत होते?
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीत असे समोर आले की, केवळ दोन लॉगिन आयडींवरून 1171 अर्ज भरले गेले होते, त्यापैकी 22 अर्ज बार्शी तालुक्यातील होते. राज्य सरकारकडून ही रक्कम मंजूर होऊन सुमारे 1 कोटी 22 लाख 95 हजार 500 रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले होते.
लाडकी बहीण योजनेतील बोगस अर्जांची चौकशी सुरू
महिला व बाल विकास विभाग, महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त तपास सुरू केला आहे. चौकशीत हे उघड झाले की, लातूर आणि सांगली जिल्ह्यांतील अंगणवाडी सेविका असल्याचे भासवून बनावट लॉगिन आयडी तयार करण्यात आले आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांतील महिलांच्या नावावर अर्ज भरले गेले.
बोगस अर्ज रोखण्यासाठी शासनाची पुढील पावले
✔️ सर्व अर्जांची पुनर्तपासणी होणार
✔️ बोगस अर्जदारांची नावे उघड करत कारवाईचा इशारा
✔️ सुरक्षित लॉगिन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना
✔️ लाभार्थ्यांची अधिक कठोर पडताळणी करण्याचा निर्णय
सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mazi Ladki Bahin Yojna) पारदर्शकतेसाठी नवीन उपाययोजना राबवण्याचा विचार सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होणार आहे.
🔴 हेही वाचा 👉 Ladki Bahin Yojana February Payment Update: 16 लाख महिलांना बसला फटका, मिळणार नाही फेब्रुवारीचा हफ्ता.