‘या’ यादीतील लाखो लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र! जाणून घ्या कारण Majhi Ladki Bahin Yojana Ineligible List Maharashtra 2025

3 Min Read
Majhi Ladki Bahin Yojana Ineligible List Maharashtra 2025

Majhi Ladki Bahin Yojana Ineligible List Maharashtra : महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) तब्बल ५ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. शासनाने २८ जून २०२४ आणि ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित केलेल्या निर्णयानुसार या महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. जाणून घ्या, नेमक्या कोणत्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आणि यामागचे नेमके कारण काय आहे.

कोणत्या महिलांना अपात्र ठरवले?

राज्य सरकारच्या पडताळणी प्रक्रियेत खालील गटातील ५ लाख महिला अपात्र ठरल्या आहेत:

✅ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी – २,३०,००० महिला
✅ ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला – १,१०,००० महिला
✅ कुटुंबात चारचाकी वाहन असलेल्या, नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी व योजनेतून स्वेच्छेने नाव मागे घेणाऱ्या महिला – १,६०,००० महिला

महिलांकडून पैसे परत घेणार नाही!

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, योजनेच्या आधीच्या हप्त्यांचे पैसे महिलांकडून सक्तीने परत घेण्यात येणार नाहीत. मात्र, जानेवारी २०२५ पासून या महिलांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही.

🔴 हेही वाचा 👉 लाभार्थी महिलांना मोठा दिलासा, आत्तापर्यंत जमा झालेले पैसे परत घेणार नाही – अदिती तटकरे.

पडताळणी का झाली?

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना (Mazi Ladki Bahin Yojana) २१ ते ६५ वर्षे वयोगटातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. परंतु, निकष न पाळणाऱ्या महिलांनीही लाभ घेतल्याचे आढळल्याने शासनाने प्राथमिक तपासणी करून ५ लाख महिलांना अपात्र ठरवले आहे.

महिला लाभार्थींसाठी मोठी अपडेट!

✔ पात्र महिलांना पुढचे हप्ते नियमित मिळणार
✔ जानेवारीपासून अपात्र महिलांना लाभ मिळणार नाही
✔ पूर्वी जमा झालेले पैसे सरकार सक्तीने परत घेणार नाही

🔴 हेही वाचा 👉 ‘या’ नागरिकांना आता रेशनऐवजी थेट पैसे; सरकारचा नवा निर्णय लागू.

तुम्ही पात्र आहात का?

तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तर तुमचे नाव अपात्र महिलांच्या यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी स्थानिक प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधा, अपात्र महिलांची यादी (Ladki Bahin Yojana Ineligible List Maharashtra) लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन नाव तपासू शकता.

🔴 नोकरी👉 महाराष्ट्र पोलीस भरती 2025: 10,000 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार!.

Share This Article