Majhi Ladki Bahin Yojana January 2025 Installment Update: महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. जानेवारी महिन्याच्या हफ्त्याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या 7व्या हफ्त्याचे पैसे 24 जानेवारी पासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या ७व्या हफ्त्याबाबत अपडेट
- २४ जानेवारी २०२५ पासून पात्र महिलांच्या बँक खात्यात जानेवारी महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
- २५ जानेवारी २०२५ रोजी तब्बल १.३१ कोटी महिलांच्या खात्यात योजनेची रक्कम जमा करण्यात आली आहे.
- आतापर्यंत एकूण २.४१ कोटी महिलांना जानेवारी महिन्याचा लाभ मिळाला आहे.
- २६ जानेवारी २०२५ पर्यंत उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हफ्त्याची रक्कम जमा होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आहे.
महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे वक्तव्य
अदिती तटकरे यांनी सांगितले की, “या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार मिळत असून, त्यांचे जीवनमान उंचावत आहे. सरकारकडून फेब्रुवारी महिन्याचा लाभ वेळेत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.”
महिलांसाठी सूचना
- महिलांनी आपले बँक खाते अपडेट ठेवा.
- लाभ वेळेत मिळाला नाही तर सरकारी हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
🔴 हेही वाचा 👉 Free Silai Machine Yojana Maharashtra 2025: येथे करा मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज.