Mini Tractor Yojana 2025 Online Application Started Maharashtra : महाराष्ट्र सरकारने २०२५ च्या (Mini Tractor Yojana Maharashtra) मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी ९०% अनुदान उपलब्ध आहे. उर्वरित १०% रकमेसाठी शेतकऱ्यांना स्वतः निधी उपलब्ध करावा लागतो. या योजनेचा लाभ विशेषत: बचत गटांना, म्हणजेच स्वयंसहाय्यता गटांना दिला जातो.
योजनेची पात्रता आणि अनुदान
मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना ९०% अनुदान दिले जाते, जे ३ लाख १५ हजार रुपयांपर्यंत असू शकते. योजनेचा लाभ घेण्यासाठी, स्वयंसहाय्यता गटातील कमीत कमी ८०% सदस्य नवबौद्ध व अनुसूचित जातीचे असावे लागतात. मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी जास्तीत जास्त ३ लाख ५० हजार रुपये खर्च करता येतात.
🔴 हेही वाचा 👉 अपात्र लाडक्या बहिणींची तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईल ॲप; त्वरित कारवाईची हमी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे. सध्या नांदेड जिल्ह्यासाठी ऑनलाइन अर्ज सुरू आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०२५ आहे. अर्ज सादर केल्यानंतर, अपलोड केलेल्या कागदपत्रांची झेरॉक्स संबंधित कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
शेतीमध्ये मिनी ट्रॅक्टरचा वापर
शेतीच्या विविध कामांसाठी मिनी ट्रॅक्टर आता अत्यंत उपयुक्त ठरले आहे. नांगरणी, वखरणी, कोळपणी इत्यादी कामे मिनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचतो आणि श्रमाची बचत होते. या योजनेमुळे मिनी ट्रॅक्टर खरेदी करणे शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभ होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात अर्ज सुरू, शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२५
नांदेड जिल्ह्यात मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी (Mini Tractor Yojana) अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, इच्छुक शेतकऱ्यांना १० फेब्रुवारी २०२५ पूर्वी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.