Mukhyamantri Annapurna Yojana Free Gas Cylinder Benefits: महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत (Mukhyamantri Annapurna Yojana 2025 Maharashtra) महिलांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता लवकरच दुसरा मोफत गॅस सिलिंडर मिळण्याची शक्यता आहे.
महिला सशक्तीकरण आणि आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातात. याशिवाय प्रधानमंत्री उज्वला योजना आणि लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना वर्षाला ३ मोफत गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरीब कुटुंबातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे.
कधी मिळेल मोफत गॅस सिलिंडर?
मिळालेल्या माहितीनुसार, योजनेअंतर्गत ऑक्टोबर महिन्यात एका मोफत गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात आले आहे. आता दुसऱ्या गॅस सिलिंडरचे वितरण लवकरच करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे गरजेचे आहे.
लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, २१०० रुपये मिळणार का? असा प्रश्न महिलांच्या मनात आहे. याबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊन योजनेचा पुढील लाभ घोषित करण्याची शक्यता आहे.
🔴 हेही वाचा 👉 अपात्र महिलांकडून पैसे वसूल करणार का? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले.
अन्नपूर्णा योजनेच्या अटी
- लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
- महिला ही प्रधानमंत्री उज्वला योजनेची लाभार्थी असावी.
- लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मते, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना (Mukhyamantri Annapurna Yojana) या योजनेमुळे राज्यातील गरीब महिलांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. याशिवाय, महिलांच्या आरोग्य आणि स्वयंपाकाच्या सुविधांमध्ये सुधारणा होईल.
🔥 हेही वाचा 👉 जानेवारी २०२५ सन्मान निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा.
लाडक्या बहिणींना दिलेल्या या सुविधेमुळे त्यांचे जीवन सुलभ होण्याची अपेक्षा आहे. लवकरच दुसऱ्या मोफत गॅस सिलिंडरचे वितरण करण्यात येणार आहे.