Online Voter ID Registration Maharashtra 2025 : भारत सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेमुळे आता मतदार ओळखपत्र (Voter ID) बनवण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या सहजपणे तुमच्या स्मार्टफोनवरून मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि मोफत आहे. चला तर मग, सविस्तर जाणून घेऊया मतदार ओळखपत्र काढण्याची संपूर्ण प्रक्रिया.
ऑनलाइन मतदार ओळखपत्र कसे काढावे?
Voter ID Card Online Apply Maharashtra : मतदार ओळखपत्रासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने अधिकृत ‘Voter Helpline’ अॅप उपलब्ध करून दिले आहे. याच्या मदतीने तुम्ही नवीन मतदार नोंदणी करू शकता.
१. Voter Helpline अॅप डाऊनलोड करा
- सर्वप्रथम Google Play Store किंवा Apple App Store वरून ‘Voter Helpline’ अॅप डाउनलोड करा.
- अॅप उघडून ‘नवीन मतदार नोंदणी’ वर क्लिक करा.
- येथे तुम्हाला *फॉर्म 6 भरावा लागेल.
२. महत्त्वाची माहिती भरा
- तुमचे राज्य, जिल्हा आणि विधानसभा मतदारसंघ निवडा.
- जन्मतारीख प्रविष्ट करा आणि जन्मदाखल्याचा पुरावा (जसे की आधार कार्ड) अपलोड करा.
- एक अद्ययावत फोटो (२००KB पेक्षा कमी आकाराचा) अपलोड करा.
- नाव, लिंग, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा.
३. पत्ता आणि ओळख पुरावा द्या
- पालक किंवा जो नातेवाईक आहे त्यांचे नाव भरावे.
- तुमचा संपूर्ण पत्ता, पोस्ट ऑफिस आणि पिन कोड प्रविष्ट करा.
- पत्त्याचा पुरावा (Electricity Bill, Ration Card, आधार कार्ड इत्यादी) अपलोड करा.
४. अर्ज सबमिट करा आणि स्टेटस ट्रॅक करा
- सर्व माहिती भरल्यानंतर Submit वर क्लिक करा.
- तुम्ही अर्जाच्या स्थितीचा ‘Track Status’ पर्यायाद्वारे तपास करू शकता.
महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा:
✔ ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, कोणतेही शुल्क नाही.
✔ ऑनलाइन अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला नवीन मतदार ओळखपत्र पोस्टाने पाठवले जाईल.
✔ जर तुमच्या कागदपत्रांमध्ये काही अडचण असेल, तर निवडणूक आयोगाकडून तुम्हाला सूचना दिल्या जातील.
घरबसल्या मतदार ओळखपत्र मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग!
जर तुम्हाला तुमचे मतदार ओळखपत्र मिळवायचे असेल तर आता सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. स्मार्टफोनवरून सहज अर्ज करा आणि तुमचे नवीन मतदार ओळखपत्र मिळवा!
👉 मित्रांसोबत शेअर करा आणि त्यांनाही माहिती द्या!
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी अर्ज कुठे आणि कसा करायचा?.