PM Kisan Yojana 19th Installment: १९व्या हफ्त्याची तारीख जाहीर, कुणाला मिळणार लाभ आणि कुणाला नाही? जाणून घ्या

2 Min Read
PM Kisan Yojana 19th Installment Release Date Benefits Eligibility

PM Kisan Yojana 19th Installment Release Date Benefits Eligibility : पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची आर्थिक सहाय्य योजना आहे, जी २०१९ पासून देशातील गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत पुरवते. प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत वार्षिक ६,००० रुपये दिले जातात, जे तीन समान हफ्त्यांमध्ये दिले जातात. आता, १८वा हफ्ता जाहीर झाल्यापासून ३ महिने उलटले आहेत आणि देशभरातील शेतकरी १९व्या हफ्त्याची प्रतीक्षा करत आहेत.

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे की, २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पीएम किसान योजनेचा १९वा हफ्ता (PM Kisan Yojana 19th Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. तथापि, काही शेतकऱ्यांना या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही.

केंद्र सरकारने योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य केली आहे. ज्यांनी ही कामे पूर्ण केलेली नाहीत, त्यांना १९व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही. याशिवाय, जर शेतकऱ्यांनी योजनेसाठी चुकीची माहिती दिली असेल किंवा त्यांचे खाते डीबीटीसह जोडलेले नसेल, तर त्यांना देखील 19व्या हफ्त्याचा लाभ मिळणार नाही.

यासाठी १९व्या हफ्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक सुधारणा कराव्यात.

🔴 हेही वाचा 👉 2025 मध्ये सोन्याच्या किमतीत होणार मोठी घसरण? इकोनॉमिक सर्वे 2024-25 मध्ये मोठा अंदाज.

  1. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १९व्या हफ्त्याचे वितरण.
  2. ई-केवायसी आणि जमीन पडताळणी अनिवार्य.
  3. चुकीच्या माहितीच्या कारणामुळे लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना आधी अर्जात सुधारणा करावी लागेल.

तुम्ही देखील पिएम किसान योजनेसाठी (PM Kisan Yojana) पात्र असाल आणि तुम्हाला 19व्या हत्याचा लाभ घ्यायचा असेल, तर लवकरात लवकर या आवश्यक सुधारणा करा.

🔴 लेटेस्ट अपडेट 👉 २१०० रुपये हफ्त्याचा निर्णय कधी? अजित पवारांनी दिले महत्त्वाचे संकेत.

Share This Article