Rajmata Jijau Free Cycle Scheme Maharashtra 2025 : महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना (Free Cycle Yojana Maharashtra) सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 8 वी ते 12 वीच्या विद्यार्थिनींना मोफत सायकल दिली जाणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट
या योजनेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी मदत करणे आहे. अनेक गावांमध्ये वाहतुकीची सुविधा कमी आहे. त्यामुळे शाळा गाठण्यासाठी विद्यार्थिनींना मोठे अंतर पायी चालावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन राज्य सरकारने ही (Free Cycle Scheme In Maharashtra) मोफत सायकल योजना सुरू केली आहे.
Free Cycle Scheme साठी कोण पात्र आहे?
- विद्यार्थिनी इयत्ता 8 वी ते 12 वी मध्ये शिकत असावी.
- शाळा घरापासून किमान 5 किलोमीटर अंतरावर असावी.
- मागील परीक्षेत किमान 50% गुण असणे आवश्यक.
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय.
सायकल वाटप प्रक्रिया
- पात्र विद्यार्थिनींना ₹5000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
- पहिल्या टप्प्यात ₹3500, नंतर उर्वरित ₹1500 दिले जातात.
- अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह शाळा व्यवस्थापन समिती किंवा पंचायत कार्यालयात अर्ज करावा.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
✅ आधार कार्ड
✅ रहिवासी प्रमाणपत्र
✅ शाळेचे ओळखपत्र
✅ पालकांचे संमती पत्र
✅ बँक खात्याचे तपशील
योजनेचे फायदे
✅ मुलींचे शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मदत
✅ वेळ आणि श्रम वाचतील
✅ लिंग समानता आणि सामाजिक न्यायाला चालना
🔥 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 1500 सोडून अजून दरमहा 1500 रुपये मिळवा.
Rajmata Jijau Free Cycle Yojana Maharashtra ही योजना ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी वरदान ठरत आहे. सायकलमुळे त्यांचा शिक्षणात सहभाग वाढेल आणि भविष्यात त्यांना चांगल्या संधी उपलब्ध होतील.
🔴 लेटेस्ट 👉 सोन्याचा आजचा भाव १४ फेब्रुवारी २०२५.