मुंबई, 14 फेब्रुवारी 2025: PM Awas 2.0 New Phase Benefits – शहरी भागातील गरजू नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे! प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 (PM Awas Yojana 2025) अंतर्गत परवडणाऱ्या घरांचे स्वप्न साकार होणार आहे. या नव्या टप्प्याला सरकारने मान्यता दिली असून, लवकरच लाभार्थी नोंदणी सुरू होणार आहे.
नव्या टप्प्यात काय आहे खास?
PM Awas Yojana 2025: प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2015 पासून राज्यात प्रभावीपणे राबविली जात आहे. आतापर्यंत 14.70 लाख घरकुलांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी 3.79 लाख घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. आता PM Awas 2.0 मध्ये घरे अधिक सुधारित स्वरूपात बांधली जाणार आहेत.
- घरांचा आकार: 30 ते 45 चौरस मीटर
- लाभार्थी गट: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)
- प्राथमिक सुविधा: शौचालय, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, वीजपुरवठा, रस्ते
🔴 हेही वाचा 👉 लाडकी बहीण योजनेचे 1500 सोडून अजून दरमहा 1500 रुपये मिळवा.
योजना कशी राबवली जाणार?
PM Awas Yojana 2.0 चार प्रमुख घटकांद्वारे राबवली जाणार आहे –
- BLC (वैयक्तिक घरकुल बांधकाम) – स्वतःच्या जागेवर घरे बांधण्याची संधी
- AHP (भागीदारी तत्वावर परवडणारी घरे) – सरकारी व खाजगी भागीदारीतून घरे
- ARH (भाडे तत्वावर घरे) – स्थलांतरित मजुरांसाठी परवडणाऱ्या घरांची सोय
- ISS (व्याज अनुदान योजना) – घर खरेदीसाठी कर्जावर व्याज सवलत
🔴 लेटेस्ट अपडेट 👉 सोन्याचा आजचा भाव १४ फेब्रुवारी २०२५.
सप्टेंबर 2024 मध्ये केंद्र शासनाने या नव्या टप्प्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA) आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA) यांच्या समन्वयाने ही योजना राबवली जाणार आहे.
सध्या राज्यभरात 43,989 कुटुंबांची नोंदणी झाली असून, लवकरच अधिकाधिक लाभार्थ्यांना जोडण्याचे उद्दिष्ट आहे. PM Awas 2.0 अंतर्गत राज्यातील हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे!
🔴 हेही वाचा 👉 महाराष्ट्र अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती 2025! महत्त्वाच्या अटी व पात्रता निकष जाणून घ्या.