ई-केवायसी पूर्ण न केल्यास या योजनेतील अनेक महिलांचे अनुदान बंद होणार!

2 Min Read
E-Kyc Mandatory Sanjay Gandhi Niradhar Yojana Benefits Stopped

E-Kyc Mandatory Sanjay Gandhi Niradhar Yojana Benefits Stopped : महाराष्ट्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेच्या (Sanjay Gandhi Niradhar Yojana 2025) लाभार्थींना ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. राज्यातील अनेक महिलांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या मासिक अनुदानावर परिणाम होऊ शकतो.

🔴 हेही वाचा 👉 टॅक्सी आणि रिक्षा चालकांसाठी मोठी घोषणा! ‘निवृत्ती सन्मान योजना’ सुरू, १० हजार रुपयांचा लाभ.

मार्चपर्यंत अंतिम मुदत

ज्या लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही अशा लाभार्थ्यांसाठी मार्च 2025 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. जर त्यांनी या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर अनुदान थांबवण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ई-केवायसी अनिवार्य का?

सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये पारदर्शकता आणि अचूकता राखण्यासाठी आधार लिंक करणे आवश्यक आहे. संजय गांधी निराधार योजनेत दरमहा ₹600 अनुदान मिळते. मात्र, अनेक महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नाही, त्यामुळे त्यांना लाभ मिळण्यात अडथळा येत आहे.

प्रशासनाचे आवाहन

प्रशासनाचे लाभार्थी महिलांना त्वरित ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ज्या महिलांनी आवश्यक कागदपत्रे तहसील कार्यालयात अद्याप जमा केलेली नाहीत, त्यांनी लवकरात लवकर प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा अनुदान बंद होईल.

लाभार्थींनी काय करावे?

  1. आधार कार्ड बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी लिंक करावे.
  2. तहसील कार्यालयात जाऊन ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.
  3. मार्चपूर्वी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर मासिक अनुदान मिळणार नाही.

महिलांसाठी महत्त्वाची सूचना!

संजय गांधी निराधार योजनेचा (Sanjay Gandhi Niradhar Yojana) लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थींनी वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, त्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता आहे.

🔴 हेही वाचा 👉 शहरात राहणाऱ्या लोकांना मिळतो का लाभ? जाणून घ्या पात्रता आणि फायदे.

Share This Article