मुंबई, 17 फेब्रुवारी 2025: Ladki Bahin Yojana E-KYC Update – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र, आता या योजनेत काही महत्त्वाच्या बदलांची घोषणा करण्यात आली आहे. लाडक्या बहिणींना दरवर्षी जून महिन्यात ई-केवायसी (E-KYC) करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे महिलांच्या अर्जांची योग्य तपासणी होईल आणि त्यांची माहिती खरी आहे की खोटी, याची खात्री होईल.
लाडकी बहीण योजनेसाठी आत्तापर्यंत २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले होते, त्यातील २ कोटी ४१ लाख महिला योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. पण, यापैकी सुमारे ११ लाख महिलांच्या अर्जांची तपासणी अजून बाकी आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या महिलांचे बँक खाते आधार कार्डाशी जोडलेले नाही.
सध्या सर्व महिला लाभार्थींच्या उत्पन्नाची पडताळणी केली जात आहे. आयकर विभागाला असे निर्देश देण्यात आहेत की, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे अशा सर्व महिलांच्या नावाची यादी लवकरात लवकर महिला व बालविकास मंत्रालयाकडे पाठवावी त्यानंतर अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या सर्व महिलांना योजनेतून वगळले जाईल.
यापूर्वी संजय गांधी निराधार योजनेतील २.३ लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आले होते. तसेच, सरकारच्या इतर योजनांमध्ये १५०० किंवा त्यापेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना देखील वगळण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेच्या पाभार्थी महिलांची ई-केवायसी प्रक्रिया प्रत्येक वर्षी १ जून ते १ जुलै दरम्यान केली जाईल. यामुळे लाभार्थी महिलांची माहिती खोटी किंवा योग्य आहे का, हे तपासणे शक्य होईल.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात येत असलेल्या या बडलांचा मुख्य उद्देश योजना अधिक पारदर्शक आणि योग्य प्रकारे चालवणे आहे.
🔴 हेही वाचा 👉 सोन्याचा आजचा भाव १७ फेब्रुवारी २०२५.